आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघ-सिंहांची आगळीवेगळी शाळा.. एका रांगेत बसून घेतात धडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिको सिटी- मेक्सिकोच्या राजधानीत सुरू असलेल्या रिंगलिंग ब्रदर्स अँड बार्नम बेली सर्कसचे रिंगमास्टर अलेक्झांडर लॅसी ‘ड्रॅगन’ नावाचा शो सादर करण्यासाठी वाघ, सिंहांना प्रशिक्षण देत आहेत. ते एकाच वेळी चार सिंहिणी, चार वाघ व एका सिंहाला कसरती शिकवत आहेत.

विशेष बाब म्हणजे सिंहाला त्यांनी सर्वात मध्ये उंच स्टूलवर बसवले आहे. बाकी सर्व वाघ, सिंह जमिनीवर एका रांगेत बसले आहेत. जणू काही ते म्हणताहेत की, मिळून सर्वजण कसरती करूयात. परंतु जंगलाचे खरे राजे तर आपणच आहात. त्यामुळे त्याला सिंहासनावर बसवले आहे.