आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोग्राफी करताना सिंहाने केला भारतीय महिलेवर अटॅक, पाहा थरारक VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंह आपल्या हिंसक वृत्तीसाठीच ओळखला जातो. तो मोठ-मोठ्या प्राण्यांना शिकार बनवतो. तरीदेखील अनेक लोक जंगलाच्या राजाच्या जवळ जाण्याची जोखिम पत्कारतात. असेच अनेक प्राणी संग्रहालय आहेत, जे सिंहाच्या जवळ जाण्याची लोकांची इच्छा पूर्ण करतात. यादरम्यान सिंह प्रशिक्षकासोबत शांत बसलेला असतो. परंतु काहीवेळा प्रशिक्षकाच्या उपस्थितीतसुध्दा सिंह आसपास असलेल्या लोकांवर अटॅक करतो. असेच एक प्रकरण कॅनाडाच्या बोमॅनविल्ले प्राणीसंग्रहालयात 2008मध्ये समोर आले होते.
सांगितले जाते, की भारतीय वंशाची गीतांजली कोलानाद एका मासिकाच्या कव्हर पेजसाठी सिंहासोबत फोटोशूट करत होती. यादरम्यान सिंहासोबत दोन प्रशिक्षक होते. फोटोशूट पूर्वी गीतांजली मार्शल आर्ट करत होती, तेव्हा सिंहाने गीतांजलीवर हल्ला केला.
सिंहाने गीतांजलीवर इतक्या जोरात हल्ला केला, की ती जमीनीवर कोसळली. तेथे उपस्थित प्रशिक्षकांनी सिंहाला मागे ओढले, तेव्हा गीतंजलीचा जीव वाचला. नंतर फोटोशूट पूर्ण करण्यात आले. गीतांजली भारतीय मार्शल आर्टची एक्सपर्ट आहे. यापूर्वी मार्शल आर्ट परफॉर्म करताना तिने अनेक प्राण्यांसोबत फोटोशूट केले होते. अटॅकचा हा व्हिडिओ विविध प्लॅटफॉर्मवर खूप व्हायरल झाला. आतापर्यंत हा व्हिडिओ तब्बल 1 कोटी लोकांनी पाहिला.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा गीतांजली आणि अटॅक करणा-या सिंहाचा फोटो...