आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: शिकारीदरम्यान सिंहाच्या शरीरात घुसले म्हशीचे शिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण आफ्रिकेत कैद केलेला फोटो - Divya Marathi
दक्षिण आफ्रिकेत कैद केलेला फोटो
 
केपटाऊन- हा फोटो दक्षिण आफ्रिकेच्या माला गेम रिझर्व्हमधला आहे. येथे 5 सिंहांनी एका म्हशीवरती अटॅक केला आहे. सिंह आणि म्हैस यांच्यातील लढाई जवळपास 90 मिनीटे चालली. यादरम्यान म्हशीचे शिंग एका सिंहाच्या शरीरात घुसले आणि सिंह रक्ताने लथपथ झाला.
 
20 मीटर अंतरावरून कैद केले फोटो...
ही सर्व घटना रिझर्व्हच्या रेंजर रोन रेव्हनहिलने 20 मीटर अंतरावरून कॅमे-यात कैद केली. रेंजरने सांगितले, की त्याने यापूर्वी प्राण्यांमधील अशी लढाई कधीच पाहिली नव्हती. ही घटना जवळून पाहणे कठिण होते. रेंजर या घटनेले \'रिअॅलिटी ऑफ नेचर\' म्हटले आहे. 
 
ही म्हैस एकटी नव्हती. मात्र एक रेडा सिंहाच्या तावडीत सापडला. आधी एका सिंहाने म्हशीवर वार केला आणि त्यानंतर आणखी चार सिंह तिथे पोहोचले. सिंहांनी म्हशीवरती एकापाठोपाठ वार करण्यास सुरुवात केली. म्हैस बराचवेळ एकटीच सिंहांसोबत लढताना दिसली.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या संपूर्ण घटनेचे PHOTOS...