(पाण्यात पडलेला सिंह)
केपटाऊन- सिंहाची शिकार करणारे फोटो तुम्ही तर खूप पाहिले असतील, मात्र सिंहाला घसरून खाली पडताना कधी पाहिले आहेत का? दक्षिण आफ्रिकेमध्ये सिंहाचा एक असा फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये तो धपकन पाण्यात पडताना कॅमे-यात क्लिक झाला आहे. ही घटना दक्षिण अफ्रिकेच्या वोस्बर्गच्या जवळ घडली.
सिंह एक तलाव पार करण्याचा प्रयत्न करत होता, तो खूप सावधानीने पाय पुढे टाकत होता. मात्र त्याने चुकून एका ठिकाणी पाय ठेवला आणि खाली पडला. खाली पडून तो दूरवर निघून गेला. मात्र काही वेळानंतर तो पुन्हा उठला. फोटोग्राफरने सांगितले, की ती एक सुरक्षित ठिकाणी होती आणि तिथूनच तिने फोटो क्लिक केले. तिने सांगितले, की एका तलावाजवळ एक खडक होते, तिथून सिंह सरळ जमिनीवर जाऊन पडला. शेवटच्या फोटोमध्ये सिंह फोटोग्राफरकडे वळून पाहातानासुध्दा दिसतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या घटनेचे फोटो...