आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lion Shouted When Crocodile Come In Front In River

सिंहिणीचा पाठलाग करताना गेला असता जीव, सिंहासमोर आली अजस्त्र मगर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक सिंह सिंहिणीचा पाठलाग करीत होता. सिंहिण नदीत शिरली. पलिकडच्या काढावर निघाली. त्यानंतर सिंहही नदीत शिरला. पण तेव्हा एक अजस्त्र मगर त्याच्यासमोर आली. वाघाने डरकाळ्या फोडण्यास सुरवात केली. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. कदाचित जोरदार डरकाळ्या फोडून त्याला मगरीला पळवून लावायचे असेल. ही संपूर्ण घटना 47 वर्षीय महिला फोटोग्राफर मार्ना वॉन डेर वॉल्ट यांनी कॅमेऱ्यात टिपली आहे.
बोत्सवानामधील ओकावांगो डेल्टाच्या ड्यूबा प्लेन्समध्ये ही घटना घडली. सिंहाने डरकाळ्या फोडण्यास सुरवात केली. तेव्हा त्याच्या दिशेने आलेली मगर जरा थबकली. दोघांची नजरानजर झाली. त्यानंतर मगर मागे हटली. तेथून निघून गेली.
Facts
- जगातील सर्वांत मोठे सिंह आफ्रिकेत आढळून येतात. आकाराने हे मोठे असतात. यांची लांबी 6 फुट आणि वजन सुमारे २०० किलो असते.
- आफ्रिकेत मगरीची नील प्रजाती आढळून येते. यांची लांबी 16 फुट आणि वजन सुमारे 250 किलो असते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, मगरीला बघून डकराळ्या फोडणाऱ्या सिंहाचे फोटो....