आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lioness Attacks Crocodile In Kruger National Park

भुकेल्या सिंहीणने केली मगरीची शिकार, काही वेळातच व्हिडिओ झाला लोकप्रिय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण अफ्रिकेच्या क्रुगर नॅशनल पार्कमध्ये अलीकडेच एक रंजक व्हिडिओ शुट करण्यात आला आहे. त्या व्हिडिओमध्ये नदीच्या किना-यावर उन्हात झोपलेल्या मगरीवर भुकेल्या एकट्या सिंहीणने जोरदार हल्ला केला. हा हल्ला इतका भयानक होता, की मरगीला आपले जीव वाचवण्याची एकही संधी मिळाली नाही.
या घटनेची ज्या व्यक्तीने व्हिडिओ बनवला त्याने तो तातडीने यूट्यूबवर शेअर केला. काही कालावधीतच हा व्हिडिओ लोकप्रियसुध्दा झाला. व्डिडिओमध्ये, सिंहीणने केलेली शिकार जेव्हा दोन सिंह शेअर करण्यास येतात तेव्हा ती त्यांना बघून आपली शिकार दुर ओढत नेते. परंतु त्यांच्यासोबत ती शिकार शेअर करत नाही.
2012मध्ये एका मगरीवर अशाच एका सिंहीणने केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला होता. तो व्हिडिओ जवळपास अक्षरश: 24 लाखांपेक्षा जास्त वेळा बघितला गेला होता. बोत्सवानाच्या या घटनेमध्ये सिंहाच्या पूर्ण समूहाने एका मगरीवर हल्ला चढवला होता. त्या मगरीवर झडप घालून तिला आपले शिकार बनवले होते.
छायाचित्रांमध्ये बघा सिंहीणने मगरीवर कशाप्रकारे चालाखी दाखवून घातली झडप? पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा हे भन्नाट छायाचित्रे..