आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हैदराबादला जिवंत मासळी टाकतात तोंडात, असा करतात उपचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- या शहरात अस्थमाचा (दमा) जरा वेगळ्या पद्धतीने उपचार केला जातो. रुग्णाना औषोधोपचार किंवा इतर पद्धती न सांगता तोंडात थेट जिवंत मासळी सोडली जाते. प्रत्येक वर्षी जून महिन्यात अस्थमाच्या उपचार करण्यासाठी देश-विदेशातील लाखो लोग येथे येतात. ही परंपरा तब्बल 156 वर्ष जूनी असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. तोंडात मासळी टाकण्यापूर्वी तिच्या तोंडात पिवळ्या रंगाचा एक आयुर्वेदिक लेप लावला जातो. असे केल्यावर रुग्णाला श्वास घेणे सोपे जाते असे दावा केला जातो.
गेल्या तीन वर्षांत माझा अस्थमा बरा झाला असल्याचा दावा एका रुग्णाने केला आहे. येथे आल्यावर अशा प्रकारे दावा करणारे अनेक जण भेटतात. लहान मुले आणि महिलांना मासळी देण्यासाठी आधी त्यांना घट्ट पकडले जाते. त्यानंतर त्यांच्या तोंडात जिवंत मासळी टाकली जाते. 'बथिनी गाउड फॅमिली'कडून याचे आयोजन केले जाते. मासळीच्या तोंडात टाकण्यात येणाऱ्या पिवळ्या रंगाच्या आयुर्वेदिक लेपाचा फॉर्म्युला त्यांना माहित असल्याचे सांगितले जाते. तोंडात मासळी टाकल्यावर मानेची हळूच हाताने मसाज केली जाते.
पुढील स्लाईडवर बघा, अस्थम्याच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या मासळीच्या उपचाराचे फोटो....