आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शहरात पँट न घालताच फिरताहेत लोक, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडनच्या ट्यूब रेल्वेचा फोटो - Divya Marathi
लंडनच्या ट्यूब रेल्वेचा फोटो
लंडन- इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये सध्या लोकांना सांगितले जात आहे, की जर कुणाला विना पँट पाहिले तर अचंबित होऊ नका. 10 जानेवारीला येथे 'नो पँट्स सबवे राइड' होणार आहे. त्याची तयारी सर्व शहरात आजपासूनच सुरु झाली आहे. याचे आयोजन करणा-या ग्रुपचे म्हणणे आहे, की ते असे केवळ लोकांना हसवण्यासाठी करतात.
नाही वाटत लाज, महिलासुध्दा घेतात भाग-
याला नो पँट्स सबवे राइड किंवा नो पँट्स ट्यूब राइडसुध्दा म्हटले जाते. लंडनमध्ये हा दिवस सातव्यांदा साजरा केला जातोय. याचे दरवर्षी आयोजन करणा-या एका ग्रुपचे म्हणणे आहे, की कुणाचा अपमान करण्याचा त्यांचा हेतू नाहीये. लोक यामध्ये स्वत: सामील होतात. पुरुषांशिवाय महिलासुध्दा सामील होतात.
कशी झाली सुरुवात-
नो पँट्स कॅम्पेनची सुरुवात 2002मध्ये न्यूयॉर्कपासून झाली होती. सात युवकांच्या एका गमतीतून ही कल्पना समोर आली होती. हे युवक संपूर्ण दिवस विना पँट्स फिरत होते आणि परंतु काही वेळेनंतर त्यांना आक्षेपार्ह म्हणून अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांना नंतर सोडून देण्यात आले. परंतु दरवर्षी लोकांनी यात सहभाग घेण्यास सुरुवात केली. जर्मन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि रोमानियामध्येसुध्दा हा दिवस साजरा होतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इव्हेंटचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...