आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्बी डॉलसारखे दिसण्याच्या हौसेखातर तिने सर्जरीवर खर्च केले तब्बल 22 लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजल्स - येथील 30 वर्षीय ओफेलिया व्हॅनिटी (Ophelia Vanity) हिने ह्युमन बार्बी डॉलसारखे दिसण्यासाठी सर्जरीवर सुमारे 22 लाख रुपये खर्च केले आहेत. एवढेच नाही तर, बॉडी अधिक परफेक्ट व्हावी यासाठी तिला आणखी काही सर्जरी करण्याची इच्छा आहे. 

लहानपणापासूनचे स्वप्न 
- ओफेलियाने सांगितले की, बार्बीसारखे दिसायचे हेच तिचे स्वप्न होते. तिने सांगितले की, मी जेव्हा लहान होते, त्यावेळी मला ख्रिसमस किंवा बर्थ-डे ला दरवर्षी डॉल मिळायच्या. त्या डॉल्सबरोबर खेळायला मला फार आवडायचे. 
- हळू हळू त्या डॉल्सबरोबरचा तिची जवळीक निर्माण होऊ लागली. ही जवळीक एवढी जास्त होती की, तीही काहीसी डॉलसारखी दिसू लागली आणि तिची तशी इच्छाही वाढायला लागली. 
- ओफेलियाने डॉलसारखे दिसण्यासाठी आधी मेकअप सुरू केले. तसेच कपडेही ती परिधान करू लागली. 
- वाढत्या वयाबरोबर तिच्यात अनेक बदलही झाले आणि ती बार्बीसारखी दिसू लागली. 
- 2009 मध्ये तिने सर्वात आधी चेहऱ्यावर 'Botox' इंजेक्शन घेतले. तसे पाहता त्यावेळी ती काही नर्व्हस होती. 
- त्यानंतर तिने हा प्रकार सुरू ठेवला. जवळपास चार वर्षात तिने ओठ, डोळे, नाक आणि चेहऱ्यावर अनेक इंजेक्शन घेतले आणि सर्जरी करून घेतल्या. 
- तिने सांगितले की, माझे डोळे नैसर्गिकच मोठे आहेत. पण मला ते अधिक सुंदर बनवायचे आहेत. 
- ओफेलियाने सांगितले की, बॉडी ट्रान्सफॉर्मेशनवर आतापर्यंत तिने सुमारे 22 लाख रुपये ($35,000) खर्च केले आहेत. 
- एवढेच नाही तर तिला ब्रेस्ट आणि बम इम्प्लांटही करायचे आहेत. त्यासाठी ती पैसे साठवत आहे. एका चांगल्या डॉक्टरच्याही ती शोधात आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, ओफेलियाचे आणखी काही Photos..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
 
बातम्या आणखी आहेत...