आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानाडोळा: 14 लाखांची सायकल चोरी, तक्रार नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचकुला- हरियाणातील पंचकुलाचे एनआरआय इंद्रजित सोनी अँडी यांची सायकल चोरीला गेली. परंतु अगोदर चोरीचा दावा ऐकून घेण्यासही पोलिसांनी नकार दिला होता. मात्र आता ही सायकल क्षुल्लक नसून 14 लाख रुपयांची विशेष सायकल आहे, असे सांगितल्यानंतरही ते स्वीकारण्यास तयार नव्हते. अखेर वरिष्ठ अधिकाºयाचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली.

बँकर असलेले इंद्रजित यांची सायकल जेव्हा चोरीला गेली तेव्हा ते घरीच होते. सायंकाळी बाहेर आल्यानंतर त्यांना सायकल चोरीला गेल्याचे आढळून आले. नाइट हॉक कंपनीच्या या विशेष सायकलची किंमत 14-15 लाख रुपये आहे. ही सायकल जहाजाने भारतात आणण्यासाठी सुमारे 7 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सायकलचे टायर मेड इन हॉलंड आहे आणि अनेक लाख रुपयांचे आहे. त्याची असेम्बलिंग कॅनडामध्ये केली जाते. सायकलला 18 गिअर आहेत आणि चेन लेदरची आहे. पँडल करत असल्याची जाणीवही सायकल चालवताना होत नाही. गिअर शिफ्टिंगही खूप मृदू स्वरूपाची आहे. अशा आकाराची सायकल भारतात खूप कमी प्रमाणात दिसून येते. त्यामुळे शेजारी देखील ही सायकल पाहण्यासाठी येत होते.

तरुणांमध्ये अमली पदार्थांसंबंधी जागृती करण्यासाठी अँडी प्रयत्नशील होते. परंतु आता मनातील इच्छा मनात राहिली. माझे स्वप्न अर्धवटच राहिले. अँडी 2012 मध्ये अमेरिकेच्या सिनेटचे आॅफिशियल सदस्य राहिले आहेत.

नाइट हॉक कंपनीची सायकल
>18 गिअरची सायकल, गिअर शिफ्ट करणे सोपे
>लेदरची चेन जी पडत नाही
>मेड इन हॉलंडचे टायर
>असेम्बलिंग कॅनडामध्ये होते