आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे भंगारमध्ये सडत आहेत महागड्या गाड्या, फरारीही रस्त्यावर पडली आहे बेवारस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एअरपोर्टवर बेवारस पडलेली फरारी एन्जो. - Divya Marathi
एअरपोर्टवर बेवारस पडलेली फरारी एन्जो.
जगातील अशा अनेक महागड्या कार ज्या खरेदी करण्याची आपण फक्त स्वप्ने पाहू शकतो, त्या जर रस्त्यावर भंगारमध्ये पडलेल्या आढळल्या तर तुम्ही काय कराल? हो, असाच काही प्रकार दुबईत पाहायला मिळाला. याठिकाणी पोलिसांकडे जगातील सर्वात महागड्या आणि बेवारस कार आढळल्याची 3000 प्रकरणे समोर आली आहेत. 

बेवारस पडल्या आहेत 5 कोटी कार.. 
- दुबईच्या एका एअरपोर्टवर 5 कोटी किमतीची Ferrari Enzo सुपरकार बेवारस अवस्थेत आढळली. कचऱ्याप्रमाणे धूळ खात पडलेल्या या कारच्या मालकाचा पत्ता नाही आणि पोलिसांनाही त्याचा रजिस्ट्रेशन नंबरही मिळाला नाही. 

नंतर समोर आली धक्कादायक बाब... 
- एकापाठोपाठ एक अशी हजारो प्रकरणे समोर आल्यानंतर हे समोर आले आहे की, दुबईतील शरियत कायदा यामागे कारणीभूत आहे. या कायद्यानुसार जर तुम्ही चेक किंवा उधारीवर एखादी कार घेतली आणि चेक बाऊन्स झाला तर तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. 
- मजेशीर बाब म्हणजे, काही लोकांनी या कायद्याची खिल्ली उडवण्याचा प्रकार सुरू केला आहे. काही लोकांनी बनावट चेकद्वारे या कार खरेदी केल्या. त्यात मनसोक्त फिरले आणि जेव्हा चेक बाऊन्स झाला, तेव्हा या कार बेवारस सोडून दूर निघून गेले. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, बेवारस अवस्थेत आढळलेल्या सुपर कार.. 
 
बातम्या आणखी आहेत...