आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Magical Photos By Russian Photographer Margarita Kareva

ही आहेत बोलकी छायाचित्रे, फोटोंमध्ये जिवंतपणा आणण्यात पटाईत आहे मार्गरीटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुसी फोटोग्राफर करेवाने काढलेले छायाचित्र...
एक छायाचित्र हजारो शब्द बोलते, असे म्हटले जाते. परंतु छायाचित्रांच्या माध्यमातून हजार शब्द बोलते करण्यासाठी छायाचित्रकारांना दिवस-रात्र कष्ट घ्यावे लागते. प्रत्येक छायाचित्रकारांची एक वेगळी पध्दत आणि वेगळे कौशल्य असते. कुणी वाइल्ड लाइफ संबधित फोटो काढण्यात पटाईत असतात तर कुणी अंडवाटर फोटोग्राफीसाठी ओळखले जातात. काही छायाचित्रकार तर सामान्य लोकांच्या आयुष्यातील फोटो काढून त्यांना बोलते करतात. आता फोटोग्राफीमध्ये फोटोशॉपचा वापर होत असल्याने या सर्व गोष्टी सोप्या झाल्या आहेत.
अशीच एक रुसची छायाचित्रकार आहे. तिचे नाव मार्गरीटा करेवा. मार्गरीटा महिलांचे फोटोग्राफ घेऊन त्यांना सुंदर राजकुमारीपासून ते डायनच्या रुपापर्यंत सजवण्यात ती माहिर आहे. तिच्या फोटोंना बरीच लोकप्रियता मिळते. तिने केवळ तीन वर्षांपूर्वीपासून फोटोग्राफीला सुरुवात केली आहे. एवढ्या कमी कालावधीत तिने इतकी सुंदर छायाचित्रे क्लिक करून प्रसिध्द केली आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मार्गरीटाची बोलकी आणि सुंदर छायाचित्रे...