आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या नदीत आहे अमाप सोने, संशोधकांसाठी आजही आहे रहस्‍य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झारखंडच्‍या स्‍वर्णरेखा नदीमध्‍ये अमाप सोने आहे. - Divya Marathi
झारखंडच्‍या स्‍वर्णरेखा नदीमध्‍ये अमाप सोने आहे.
सध्‍या भारतात सगळीकडे दिवाळीनिमित्‍त आनंद, उत्‍साहाच वातावरण आहे. या सणाचे औचित्‍य साधून भारतात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जाते. मात्र तुम्‍हाला आश्‍चर्य वाटेल की, भारतात अशीही एक नदी आहे, जिच्‍यामध्‍ये हात टाकताच, हाती सोने लागते. होय, हे सत्‍य आहे. झारखंडच्‍या रत्‍नगर्भा परिसरातील स्‍वर्णरेखा नदी सोन्‍याने संपन्‍न आहे. त्‍यामुळेच तिला स्‍वर्णरेखा असे नाव देण्‍यात आले आहे. येथील आदिवासी या नदीमधून सोन्‍याचे कण गोळा करतात आणि ते व्‍यापा-याला विकून आपला उदरनिर्वाह करतात. 
 
कोठून येते नदीत सोने? 
- येथील लोकांचे म्‍हणणे आहे की, या नदीत इतक्‍या मोठ्या प्रमाणात सोने कसे काय आहेत? यावर अनेकदा रिसर्च करण्‍यात आला आहे. मात्र अजुनही हे रहस्‍य उलगडण्‍यात संशोधकांना यश आलेले नाही.  
- या नदीची आणखी एक विशेषता म्‍हणजे उगमस्‍थळावरुन प्रवाहीत झाल्‍यानंतर ही नदी इतर कोणत्‍याही नदीला जाऊन मिळत नाही. ती सरळ बंगालच्‍या उपसागरात विलिन होते. 

पुढील स्‍लाइडवर पाहा, कशा पद्धतीने नदीतून सोने काढतात लोक...    
 
 
बातम्या आणखी आहेत...