आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेकडून चुकून या मुलीच्या अकाऊंटवर डिपॉझिट झाले 31 कोटी; बघा, अशी केली तिने एैश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुआलालंपूर- ऑस्ट्रेलियात बँकच्या चुकीमुळे एका विद्यार्थिला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्‍यात आले आहे. वेस्टपॅक बॅंकेकडून चुकून तिच्या अकाऊंटवर सुमारे 31 कोटी रुपये (46 लाख डॉलर) डिपॉझिट झाले होते. क्रिस्टीन जियाशिन असे या तरुणीचे नाव आहे.

आपल्या अकाउंटवर भली मोठी रक्कम झाल्याचे लक्षात येताच क्रिस्टीन हिने ते लक्झरी वस्तुंवर खर्च केले. मात्र, आता हे प्रकरण कोर्टात गेले आहे.

बॅंकेने केली 31 कोटी रुपये परत करण्याची मागणी...
- हे प्रकरण 2012 मधील आहे. मलेशियात राहाणारी क्रिस्टीन जियाशिन (21) च्या अकाऊंटवर वेस्टपॅक बॅंकेकडून चुकून 31 कोटी रुपये जमा झाले होते.
- अकाऊंटर लिमिटपेक्षा जास्त रक्कम असल्याचे जुलै 2014 मध्ये क्रिस्टीनला समजले.
- क्रिस्टीनने इतकी मोठी रक्कम 11 महिन्यांच्या काळात महागडे कपडे, ज्वेलरी, बॅग्ज आणि लक्झरी वस्तूंवर खर्च केले.
- सिडनेम्ध्ये क्रिश्चियन डायर शॉपमध्ये तिने एका दिवसांत दीड कोटी रुपये खर्च केले होते.
- फंड ट्रान्सफरमध्ये चूक झाल्याचे एप्रिल 2015 मध्ये बॅंकेचे मॅनेजरच्या लक्षात आले.
- मॅनेजरने क्रिस्टीनला फोन करून अकाऊंटर चुकून जमा झालेली रक्कम परत करण्याची मागणी केली.
- इतकी मोठी रक्कम पालकांनी टान्सफर केल्याचे समजून तिने संपूर्ण रक्कम खर्च करून टाकल्याचे उत्तर क्रिस्टीनने मॅनेजरला दिले.
- आता हे प्रकरण कोर्टात गेले आहे. बॅंकेने तिच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
- पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे सिडनेमधील डाउनिंग सेंटर कोर्टाने क्रिस्टीनची निर्दोष मुक्तता केली आहे. बॅंकेच्या चुकीची शिक्षा क्रिस्टीनला का? असा सवाल कोर्टाने वेस्टपॅक बॅंकेला केला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, बॅंकेचे 31 कोटी उडवून निर्दोष सुटका झालेल्या क्रिस्टिनचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...