आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: बँकॉकमधील प्रसिद्ध माशांचे आगळेवेगळे घर, पर्यटकांना करताहेत आकर्षित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आशिया खंडात बहुमजली इमारतींसाठी प्रसिद्ध असलेल्या बँकॉक शहरात 1982 न्यू वर्ल्ड मॉल तयार झाला. आज या मॉलचे रूपांतर उजाड वस्तीत झालेले आहे. परंतु याच्या तळघरात असलेल्या पाण्यात विविध जातींचे लाखो मासे पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरले आहे. न्यू वर्ल्ड मॉलच्या बाबतीत शासनाला 1997 मध्ये माहिती प्राप्त झाली. हा मॉल बांधताना चार मजल्यांपर्यंत अधिकृत बांधकामाची परवानगी होती, परंतु येथे तब्बल 11 मजल्याचे बांधकाम करण्यात आले. शेवटी वरचे 7 मजले पाडून टाकण्यात आले. 1999 मध्ये या मॉलला आग लागल्याने शिल्लक असलेल्या इमारतीचे छत ढासळले.
पावसाचे पाणी साचल्याने या मॉलच्या तळघरात पाणी साचून येथे तळे निर्माण झाले. यानंतर येथे मोठय़ा प्रमाणावर डास वाढल्याने परिसरातील लोक त्रस्त झाले होते. त्यांनी या समस्येवर उपाय म्हणून या पाण्यात मासे आणून सोडले. काही दिवसांतच येथील डास नष्ट झाले. त्यामुळे लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. माशांची संख्या लाखोंच्या घरात गेली. उद्ध्वस्त झालेल्या मॉलमधील मासे पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढत गेला. शासनाने ही इमारत असुरक्षित असल्याचे जाहीर करूनही लोक येथे जाण्याचे थांबवेनात. शेवटी या भागाची पाहणी केल्यानंतर जुलैअखेरपर्यंत इमारत सुरक्षित आहे किंवा नाही, याचा अहवाल प्राप्त होईल. जर सुरक्षित नसेल तर इमारत पूर्णपणे पाडून टाकण्यात येणार आहे.
पुढील स्‍लाईडलवर पाहा मॉलमधील माशांचे छायाचित्रे...