आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: एक लिटर पाण्यावर \'T POWER H2O\' बाइक धावते 500 KM

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साओ पौलो (ब्राझिल)- ब्राझिलमधील साओ पौलो येथे राहाणारे रिकार्डो एजवेडो यांनी एक अद्‍भूत बाइक साकारली केली आहे. बाइकचे वैशिष्‍ट्ये म्हणजे ही चक्क पाण्यावर धावते. एक लिटर पाण्यावर ही बाइक तब्बल 500 किलोमीटर धावते. 'टी पॉवर एच2ओ' असे बाइकचे नाव आहे. रिकार्डो यांनी आपली अद्‍भूत बाइक टेस्टिंगसाठी ठेवली आहे.

रिकार्डो यांनी नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात रिकार्डो हे बाइकच्या टाकीत पाणी टाकताना दिसत आहेत. परंतु, टाकीत पाणी टाकण्याआधी रिकार्डो स्वत: पाणी पिताना दिसत आहेत. पाण्यात इतर कुठलेही इंधन मिसळले नसल्याचे रिकार्डो यांना दाखवून दिले आहे. रिकार्डो यांनी बाइकमध्ये एक बॅटरी बसवली आहे. बॅटरीच्या माध्यमातून पाण्याच्या मदतीने हायड्रोजन तयार केला जातो. कारण पाणी हे ऑक्सिजन आणि हायड्रोजनपासून तयार होते.
हायड्रोजनवर धावते बाइक...
साओ पॉलो यूनिव्हर्सिटीतील केमिस्ट्रीचे प्रा.एरनेस्टो गोनजालेज यांनी सांगितले की, रिकार्डो यांनी साकारलेल्या बाइकमध्ये मूल इंजिन बसवले असून त्यात हायड्रोजनचा फ्यूल म्हणून वापर केला जातो.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, व्हिडिओ आणि फोटो...