आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Man In Raggedy Clothes Surprises Everyone After Buying Harley Davidson Bike With Cash

भिकारी समजून हाकलत होते बाहेर, खिशातून बाहेर काढलेली गोष्ट पाहून सर्वांनी घातली तोंडात बोटे..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुन्या लोकांनी सांगितले आहे, की कोणत्याच व्यक्तिची पात्रता त्याच्या कपड्यावरुन कधीचल ठरवु नये. हे जे कोणी म्हटले होते ते परत एकदा खरे ठरले आहे. नुकतेच थायलँडमध्ये अशी एक घटना समोर आली आहे. त्यात एका माणसाच्या कपड्यावरुन त्याला भिकारी समजून सर्व लोक हाकलत होते पण जेव्हा त्याने त्याच्या खिशातून लाखो रुपयांची कॅश काढली तेव्हा सर्वजण थक्क झाले. जाणून घ्या नेमके काय घडले..
 
- सोशल साईटवर या माणसाचे फोटो बऱ्याच दिवसापासून व्हायरल होत होते. हा माणूस नेमका कोण याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही.  सुत्रांनी दिलेल्या माहितीवरुन असे कळाले आहे, की  थायलँड येथील 'Maxsingburibike' नावाच्या शोरुममध्ये फाटलेल्या कपड्यांमध्ये पोहोचला होता. 
- पहिले काहीवेळ तो खिडकीतून आतमध्ये पाहत होता आणि नंतर तो शोरुममध्ये घुसला. 
- शोरुममध्ये आल्यावर तो कोणी भिकारी अथवा कामगार असावा असे सर्वांना वाटले.
- शोरुममध्ये आल्यावर त्याने हार्ले डेविडसन खरेदी करायची आहे असे सांगितले तेव्हा सर्वजण हसायला लागले. कोणीही सेल्समन त्याकडे लक्ष द्यायला तयार नव्हता. 
- शोरुममध्ये हे सर्व होत असताना त्याने ओरडून तेथील मॅनेजरला बोलाविले आणि त्याला सर्व सांगितले. 
- 10 मिनिटानंतर त्याला हार्ले डेविडसन गाडी दाखविण्यात आली आणि तिची किंमत 12 लाख असल्याचे सांगितले. 
- यानंतर त्याने गाडी नीट निरखून पाहिली आणि खिशातून 12 लाख कॅश बाहेर काढली. 
- शोरुममधील सर्व जण त्याच्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत पाहिले. 
- यावेळी काही लोकांनी त्याचे फोटोज् घ्यायला सुरुवात केली. तिथून त्याचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले.
- एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तिच्या बहिणीने त्याची ओळख सांगितली आहे. तिने सांगितले की तिच्या भावाचे नाव लंग डेचा आहे आणि तो श्रीमंत नाही पण हार्ले डेविडसन बाईक घेण्याचे त्याचे स्वप्न होते.  
- खूप मेहनतीने त्याने पैसे जमा केले आणि तो बाईक घेण्यासाठी शोरुममध्ये आला.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, लंग डेचा चे त्याच्या ड्रिम बाईकसोबतचे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...