आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मुलाला जडला विचित्र आजार, बनत आहे दगड, सहन करतोय विलक्षण वेदना, PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रमेश दार्जी - Divya Marathi
रमेश दार्जी
काठमांडू (नेपाळ) - येथील एका 11 वर्षीय मुलाला एक विचित्र आजार जडला असून, त्‍याचे संपूर्ण शरीर दगडसारखे होत आहे. कांठमांडू येथील एका रुग्‍णालयात त्‍याच्‍यावर उपचार सुरू आहेत. रमेश दार्जी असे त्‍याचे नाव आहे. तो लवकरच बरा होईल, असे डॉक्‍टरांनी सांगितले.
जन्‍माच्‍या 15 दिवसांनतर त्‍वचा काळी व्‍हायला सुरुवात...
रमेशचे वडील नंदा यांनी 'डेलीमेल'ला सांगितले, ''जन्‍माच्‍या 15 दिवसानंतरच त्‍याची त्‍वचा काळी पडायला सुरुवात झाली. आम्‍ही त्‍याला बागलंग येथील एका डॉक्टरकडे घेऊन गेलो. त्‍याला 'फंगल इंफेक्शन' असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. रमेश 5 वर्षांचा झाला तेव्‍हा त्‍याला खूप त्रास होत होता. शरिराची आग होत होती. त्‍यामुळे त्‍याला चालणेही अवघड होत होते. या आजारामुळे तो शाळेतही जाऊ शकत नव्‍हता. नंतर आम्‍हाला कळाले की त्‍याला 'इचथ्योसिस'ने (Ichthyosis) ग्रासले आहे.
ब्रिटिश गायिकेने केली मदत
> रमेशचे वडील नंदा मजूर आहेत.
> त्‍यांना महिन्‍याकाठी 2, 500 रुपये मिळतात.
> त्‍यामुळे त्‍याच्‍या इलाजासाठी लागणारा खर्च ते करू शकत नव्‍हते.
> या काळात नेपाळी गायक संजय श्रेष्ठ याने या बाबत एक व्‍हिडिओ सोशल साइटवर अपलोड केला आणि मदतीचे आवाहन केले.
> तो ब्रिटिश सिंगर जोश स्टोन हिने पाहिला. तिने त्‍यासाठी 1 लाख 33 हजार रुपये जमवून दिले.
> आता रमेशवर काठमांडूच्‍या एका रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत.
काय आहे हा आजार
'हार्लेक्यून इचथ्योसिस' असे या आजाराचे नाव आहे. हा आजार झालेल्‍या व्‍यक्‍तीचे शरीर खवल्‍या - खवल्‍या प्रमाणे होते. काहींचे तर त्‍वचा गळून पडते आणि नव्‍याने येते. एवढेच नाही तर केस, नखं हे गळून जातात.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, लक्ष्मी प्रसाद नगाखुशी यांनी आशिया प्रेससाठी रमेशचे घेतलेले फोटोज...
बातम्या आणखी आहेत...