आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: ही आहे रिअल लाइफ व्हॅम्पायर, पाहताच वाटते भिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- रिअल लाअफ व्हॅम्पायर मारिया होस क्रिस्टर्ना)
जगभरात अनेक चित्र-विचित्र लोक आहेत, जे स्वत: वेगळा आणि हटके दाखवण्याच्या नादात वेगळेच रुप धारण करतात. अशीच एक महिला मारिया होस क्रिसर्ना आहे. मॅक्सोकोची रहिवासी या महिलेने आपल्या संपूर्ण शरिरावर टॅटू गोंदवून घेतल्याने ती रिअल लाइफ व्हॅम्पायर दिसतेय. मारियासुध्दा स्वत:ला व्हॅम्पायर मानते. तिच्या या रुपाला पाहून लहान मुलेसुध्दा घाबरतात.
35 वर्षीय मारिया टॅटू आर्टिस्ट आहे. तिने आपल्या पूर्वाश्रमी पतीच्या छळाला कंटाळून स्वत:ला काहीतरी वेगळे दाखवण्याचा नादात संपूर्ण शरीरावर टॅटू गोंदवून घेतले आहेत. एवढेच नव्हे, तिने आपल्या डोक्यावर शिंगसुध्दा उगवले आहेत, जेणेकरून ती भितीदायक दिसावी. मारियाचे म्हणणे आहे, 'मी येणा-या पिढीला व्हॅम्पायर बनून घाबरावे असे माझी इच्छा आहे.'
मारियाच्या या स्वप्नाला पूर्ण करण्याची जबाबदारी एका एन्टरटेन्मेंट कंपनीने घेतली आहे. या कंपनीला व्हॅम्पायर वुमनविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिला कंपनीमध्ये आमंत्रित केले. त्यानंतर कंपनीने तिच्या इच्छेनुसार एक मेणाचा पुतळा बनवण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून भविष्यात मारिया आपल्या पुतळ्याच्या माध्यमातून लोकांना घाबरवू शकेल. तिच्या या पुतळ्याला रिपले बिलीव्ह इट ऑर नॉट म्यूझिअममध्ये ठेवण्यात आले आहे.
मारियाचा मेणाचा पुतळा बनवणारा कलाकार ब्रूस मिलरचे म्हणणे आहे, की मारियाने आपल्या डोक्यावर विचित्र पध्दतीने शिंग उगवले आहेत. तिच्या डोक्याला मेणाचे बनवणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हते. मारियाचे मोठे दात, केस आणि तिच्या विचित्र बॉडीचा ड्राफ्ट बनवणे खूप कठिण होते. तरीदेखील आमच्या टीमने हे काम पार पाडले आणि व्हॅम्पायर वुमनचे पाच स्टॅच्यु बनवले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा व्हॅम्पायर वुमनची विचित्र छायाचित्रे...