आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics: डॉक्युमेंट्री पूर्ण करण्यासाठी या ब्रिटीश तरूणीने चक्क आदिवासीसोबत थाटले लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(30 वर्षांच्या गिनक्तोसोबत 26 वर्षांची साराह बेगम)
जगभरात अनेक चित्र-विचित्र प्रथा आपण पाहतो. त्यावर कुणाला विश्वासही बसत नसेल, मात्र अशा परंपरा आजही जगात जोपसल्या जातात. परंतु या प्रथा वर्षानुवर्षे चालत आल्या आहेत आणि काही भागांत त्या जोपासल्यासुध्दा जातात. अशीच एक परंपरा इक्वाडोरच्या अमेजन क्षेत्राच्या बरसाती जंगलाच्या हुवेयोरानी ट्राइबमध्ये आहे. या ट्राइबचे लोक आपल्याविषयी कुणाही काहीच सांगत नाहीत. जर त्यांच्याविषयी जाणून घ्यायचे असेल तर त्यांच्यासोबत लग्न करावे लागते.
अलीकडेच, अशीच एक घटना समोर आली आहे. एका 26 वर्षांच्या ब्रिटीश फिल्ममेकरला आपली डॉक्युमेंट्री फिल्म बनवण्यासाठी येथील एका आदिवासीसोबत लग्न करावे लागले. या ब्रिटीश फिल्ममेकरचे नाव साराह बेगम आहे. साराह आपल्या शॉर्ट फिल्मसाठी ट्राइबच्या लोकांच्या कामाच्या पध्दती, संस्कृती आणि सभ्यता याविषयी जाणून घेण्यासाठी आली होती. ती त्यांच्यात आल्यानंतर तिला माहिती झाले, की हे लोक अनोळखी लोकांशी बोलत नाहीत. त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी कोणत्याही सदस्यासोबत लग्न करावे लागते. त्यामुळे आपली डॉक्युमेंट्री पूर्ण करण्यासाठी तिने 30 वर्षांच्या गिनक्तोसोबत लग्न थाटले.
मात्र, हे लग्न केवल नावा पुरते आहे. या प्रोजेक्टला पूर्ण करण्यासाठी 5800 मैलचा प्रवास गाठला आहे. तेथील महिलांनी साराहला तिच्या शिलाई-रंगरंगोटीवियषी सांगितले. पुरुषांनी साराहला शिकार करण्याची पध्दत सांगितली. साराह दोन आठवडे त्यांच्यात राहिली. या लोकांशी संपर्क साधणे कठिण होते, कारण त्यांची भाषा वेगळी होती, केवळ एक व्यक्ती थोडी थोडी स्पॅनिश बोलू शकत होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा साराह बेगमची या लोकांमधील छायाचित्रे...