आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोणते कपडे परिधान करावे पालकच ठरवतात, या तरुणीला प्रेम करण्यासही आहे बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(बाहूलीप्रमाणे लहानाची मोठी झालेली मुलगी)
रशियाच्या मॉस्कोमध्ये एका तरुणीची घटना समोर आली आहे. तिला तिच्या आई-वडिलांनी अगदी बाहूलीप्रमाणे लहानचे मोठे केले. 26 वर्षांची एंजेलिका केनोव्हाने कोणते कपडे परिधान करावे हेदेखील तिचा आई-वडिलच ठरवतात. तिला कुणावर प्रेम करण्याचेसुध्दा स्वातंत्र देण्यात आलेले नाहीये. मागील दिवसांत यूक्रेनची व्हेलेरिया लुकयनोव्हाप्रमाणे हिलादेखील नवीन ह्यूमन बार्बी सांगण्यात आले आहे. एंजेलिका केनोव्हाची इंटरनेटवर खूप चर्चा रंगत आहे. नवीन ह्यूमन बार्बीला घरातून बाहेर जाण्यासाठीसुध्दा परवानगी नाहीये.
38 किलोच्या बाहूलीप्रमाणे दिसणारी ही तरुणी दावा करते, की तिने कधीच कॉस्मेटिक सर्जरी केलेली नाहीये. तरुणीने फिगर मेंटेन ठेवण्यासाठी घरीच एक खासगी ट्रेनर ठेवला आहे. विशेष म्हणजे, या तरुणीचे आई-वडील तिला बालपणापासूनच बाहूलीप्रमाणे लहानचे मोठे करत आहेत. व्हेलेरियाप्रमाणे ही तरुणीसुध्दा मॉडेल आहे. तरीदेखील पालकांच्या नियंत्रणाखाली राहते. तिला एखाद्या तरुणासोबत डेटवर जायचे असल्यास तिची आईदेखील तिच्यासोबत जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बाहूलीप्रमाणे दिसणा-या या तरुणीचे खास PHOTOS...