आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या चिमुकलीसोबतचा हा PHOTO कुणालाही दाखवू इच्छित नव्हती ही आई, पण का...?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न येथे क्लिक झालेला हा फोटो 28 वर्षीय ओलिविया आणि तिच्या मुलीचा आहे. ओलिविया तिचा बिकिनीतील हा फोटो सोशल मीडियावर हा पोस्ट करु इच्छित नाही. 'ब्लॉग हाउस ऑफ व्हाइट' या ब्लॉगमध्ये ओलिवियाने यामागचे कारण लिहिले आहे. ती लिहिते, जेव्हा मी पहिल्यांदा माझा हा फोटो पाहिला, तेव्हा तो मला मुळीच आवडला नाही. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करण्याची माझी इच्छा झाली नाही. 

 

पण या फोटोत असे काय होते, की ओलिविया तो सोशल मीडियावर पोस्ट करु इच्छित नव्हती? 
या फोटोविषयी ओलिविया म्हणते, की हा फोटो माझ्या डिलिव्हरीनंतरचा आहे. या फोटोमध्ये माझी फिगर बघून मला खूप वाईट वाटले. डिलिव्हरीनंतर माझे वजन पुर्वीपेक्षा खूप वाढले. त्यामुळे मला हा फोटो पोस्ट करायचा नव्हता. पण नंतर मी विचार केला, की फोटो बघून  नुकत्याच आई झालेल्या महिलांना प्रेरणा मिळेल. आई होणे हा एक सुंदर अनुभव असतो. त्यामुळे डिलिव्हरीनंतर वाढलेल्या वजनामुळे महिलांनी हताश होण्याचे कारण नाही. महिलांनी सकारात्मक विचार ठेवायला हवा. म्हणून नंतर ओलिवियाने तिचा हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. 

 

पेरेंटिंगविषयी लोकांमध्ये सकारात्मकता आणू इच्छिते ओलिविया
इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केल्यानंतर ओलिवियाला अनेक कमेंट्स मिळाल्या. यामध्ये काही महिलांनी तिला सांगितले, की डिलिव्हरीनंतर वाढलेल्या वजनामुळे त्यांनी फोटो पोस्ट करणे बंद केले. ओलिवियाने त्यांवर उत्तर देताना म्हटले, की आपल्या कुटुंबासोबत फोटो क्लिक करायला घाबरु नका. फोटोज बघून इतर लोक काय म्हणतील त्याचा विचारसुद्धा करु नका. बिनधास्तपणे मुलांसोबत आपले आयुष्य जगा. ओलिविया ही प्रसिद्ध ब्लॉगर आहे. ती सोशल मीडियावर आपल्या मुलांसोबतचे फोटोज नित्यनेमाने शेअर करत असते. तिचे हे फोटोज पेरेंटिंगविषयी लोकांमध्ये सकारात्मकता आणेल, असा तिला विश्वास वाटतो.


पुढील स्लाईड्सवर बघा, मुलांसोबतचे ओलिवियाचे फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...