आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 व्या वर्षी प्रेग्नेंट झाली होती ही मुलगी, नंतर दिला अजून सात मुलांना जन्म...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात लग्नापुर्वी अफेयर ठेवणे समाजाला मान्य नसते. अशा वेळी ती मुलगी प्रेग्नेंट झाली तर मोठी समस्या होते. परंतु विदेशातली परिस्थितीही काही वेगळी नाही. मेलबर्नमध्ये राहणा-या शेरोन जेबॉरने आपली स्टोरी लोकांसोबत शेयर करताना सांगितले की, ती 15 व्या वर्षी प्रेग्नेंट झाल्यामुळे तिला लोकांचे टोमणे ऐकावे लागले. शाळेतच बनली होती एका मुलीची आई...
1999 मध्ये शेरोनने आपल्या पहिल्या मुलीला जन्म दिला. त्यावेळी ती हाय स्कूलमध्ये होती. तिच्या कुटूंबियांनी अबॉर्शनसाठी खुप फोर्स केला. परंतु शेरोने बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. तिने मुलीला जन्म दिल्यानंतर तिला लोकांकडून खुप काही ऐकावे लागले. तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले गेले. परंतु सर्वात महत्तवाचे म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडने तिची साथ सोडली नाही. 

सहा मुलांनंतर केले लग्न...
15 व्या वर्षी या मुलीने पहिल्या मुलीला जन्म दिला. यामुळे त्या दोघांचे नाते अजूनच घट्ट झाले. या कपलने 2011 मध्ये लग्न केले. त्यावेळी हे दोघे सहा मुलांचे पालक होते. त्यानंतर त्यांनी अजून 2 बाळांना जन्म दिला. आज ते एकून आठ मुलांचे पालक आहेत. त्यांची सर्वात मोठी मुलगी 18 वर्षांची आहे तर सर्वात लहान बाळ हे 2 वर्षांचे आहे. 
 
यशस्वी करियरसोबतच करते बाळांचा सांभाळ
शेरोन आता 34 वर्षांची आहे. ती सांगते की, कमी वयात आई होणारी मुलगी यशस्वी करियर सांभाळू शकत नाही असे कुणी म्हटले तर चुकीचे आहे. शेरोन डाटा मार्केटिंग कंपनीमध्ये मॅनेजर आहे आणि आपला ऑनलाइन बिझनेस चालवते. ती सांगते की, आपण मन लावून काम केले, तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या या फॅमिलीचे इतर फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...