आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांनी अनुभवल्या प्रसव वेदना; महिला म्हणाल्या, आता कसं वाटतंय ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमध्ये आयोजित कार्यक्रमात वेदना अनुभवणारे पुरुष. - Divya Marathi
चीनमध्ये आयोजित कार्यक्रमात वेदना अनुभवणारे पुरुष.
बाळाला जन्म देताना महिलांना किती वेदना सहन कराव्या लागतात याची जाणीव केवळ एका महिलेलाच असून शकते असे म्हटले जाते. पण चीनमध्ये काही पुरुषांनीही हा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर या पुरुषांना त्यांच्या या अनुभवाबाबत विचारण्यातही आले. एका टिव्ही शोच्या महिलांनी याबाबत पुरुषांशी चर्चा केली.

महिलांचा त्याग आणि समर्पण याचा गौरव करण्यासाठी चीनमध्ये 20 पुरुषा एका लाईव्ह टिव्ही शोमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी प्रसुतीच्या वेळी महिलांना बाळाला जन्म देताना किती वेदना होतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

या शोमध्ये सहभागी झालेले सर्व पुरुषही आगामी काही दिवसांत बाप होणार आहेत. या सर्वांना सिम्युलेटिंग लेबरद्वारे त्या स्थितीची जाणीव करून देण्यात आली ज्यावेळी बाळाचा जन्म होत असतो. म्हणजेच जेव्हा महिलेला प्रसुती वेदना होत असतात. लेबर पेन चॅलेंजचा हा कार्यक्रम चीनच्या जियांझी प्रांतात नानचँग येथे आयोजित करण्यात आला होता.

या चॅलेंजमध्ये विजयी झालेला एक पुरुष 80 इंडेक्सपर्यंत वेदना सहन करू शकला. त्याने हे आव्हानही पेलले. हा व्यक्ती पेशाने फायर फायटर आहे. या शोच्या आयोजनाचा उद्देश महिलांचा गौरव करणे आणि पुरुषांना महिलांचा अधिकाधिक आदर करण्यासाठी प्रोत्साहीत करणे हा असवल्याचे आयोजकांनी सांगितले.

पुढील स्लाइडवर पाहा, पुरुषांनी कशा अनुभवल्या प्रसुती वेदना...