आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Millionaire Pavel Ushanov Brutally Beat Model Girlfriend Alexandra Sereda

एका चुकीची मिळाली अशी भयावह शिक्षा, मॉडेलचे झाले असे हाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरील छायाचित्रात दिसणारी तरूणी एक रुसी मॉडेल आहे. तिचे असे हाल तिच्या अज्बधीश प्रियकराने केले आहे. या मॉडेलने तिच्या प्रियकरासोबत तिने नाते कायम टिकवून ठेवण्यास नकार दिल्याने त्याला ते पटले नाही. दोन वर्षांपासून डेटिंग करणा-या प्रेयसीकडून नकार ऐकल्यानंतर तो हिंसक झाला आणि त्याने तिला खूप वाईट पध्दतीने मारहाण केली. 33 वर्षीय अज्बधीश पावेल उशनोव एक दिवशी 27 वर्षीय मॉडेल अलेंक्जेंड्रा सेरेडाच्या घरी गेला आणि तिला क्रूर पध्दतीने मारहाण करून तिच्या चेह-यावर जखमा केल्या.
पावेल उशानोवा रुस एका मोठ्या टेलिकम्युनिकेशन कंपनी डिविनोचा मालक आहे. मॉडेलला सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. परंतु तिच्यावर हल्ला केल्यानंतर पावेल फरार झाला. पोलिसांनी उद्योगपती पावेलच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारीपासून (21 मार्च) घटनेनंतर पावेल फरार आहे.
घराबाहेर घालत होता गोंधळ दार उघडताच केला हल्ला
हॉस्पिटलमध्ये दाखल असलेली अलेंक्जेंड्रा सेरेडाने सांगितले, की तिला सकाळी 7 वाजता कामावर जायचे होते. तेव्हाच अचानक दाराची बेल वाजली. त्यानंतर तिने पावेलचा आवाज ऐकला. त्याच्या आवाजात राग दिसून येत होता. तिला दार उघडण्याचा हिम्मत होत नव्हती. परंतु पावेल जात नसल्याने मॉडेलने दार उघडले. तेव्हा तिच्या रागीट प्रियकराने तिच्यावर सर्व राग व्यक्त केला.
हिंसक प्रियकराने मॉडेलचा जीव घेण्याचा केला प्रयत्न
पावेलने जवळपास 10 मिनीटांपर्यंत पायाने आणि बुक्यांनी तिला मारहाण करत राहिला. हिंसक प्रियकराच्या मारहाणमुळे तिला खूप त्रास झाला आणि तिच्या अंगावर जखमा दिसून येत होत्या. तिची अशी हालत बघून पावेल म्हणाला, 'खूप छान मला हेच हवे होते.' त्याने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला तोच ती दार उघडून बाहेर पळाली. तिच्याजवळ असलेल्या मोबाईलने तिने पोलिसांना फोन लावला आणि त्यांना सर्व घटना सांगितली. अलेक्जेंड्राला सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. तिने सांगितले की जेव्हा मला त्याने क्रूर पध्दतीने मारहाण केल्यानंतर मी स्वत:चा चेहरा आरशात बघितला तर मी एखाद्या सिनेमातील भूताप्रमाणे दिसत होते. पोलिसांनी सांगितले, की पावेल पळाला आहे. त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून वॉरंट दाखल केले आहे.
या मॉडेलचे इतर छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...