आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Miracle Of Andes: Survivor Of 1972 Andes Plane Crash

Miracle: मृतदेह खाऊन जिवंत राहिले होते हे 14 लोक, जाणून घ्या का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अँडिज फ्लाइट डिसास्टरनंतर वाचलेले लोक)
इतिहासात अनेक घटना अशा घडलेल्या आहेत, ज्यामध्ये लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागला. अशीच एक घटना 1972मध्ये अँडिजच्या खडकांवर झाला होता. या घटनेत जिवंत राहिलेल्या लोकांना 72 दिवस बर्फाच्या खडकांवर राहावे लागले होते. इतिहासात ही घटना 'मिरॅकल ऑफ अँडिज' आणि 'अँडिज फ्लाइट डिसास्टर' नावाने प्रसिध्द आहे. ही भयावह घटना 13 ऑक्टोबर 1972 रोजी झाली होती आणि याचा शिकार उरुग्वेच्या ओल्ड क्रिश्चिअन क्लबची रग्बी टीम झाली होती.
उरुग्वे एअरफोर्सचे प्लेन टीमचे खेळाडू, अधिकारी आणि त्यांचे कुटुंब आणि मित्र परिवारांना घेऊन अँडिज पर्वतावरून जात होते. प्लेनमध्ये एकूण 45 लोक स्वार होते. प्लेनने उडाण घेतल्यानंतर वातावरण खराब झाले. त्यामुळे पायलटला बर्फाचे खडक दिसले नाही. 14 हजार फुट उंचावरून हे प्लेन उडत असताना एका अँडिजच्या पर्वताला जाऊन धडकले.
या घटनेत 14 लोक वाचले-
अँडिजला धडकल्यानंतर फ्लाइटमधील अनेकांना प्राण गमावावे लागले. केवळ 27 लोकांचा जीव वाचला. त्यांनासुध्दा जीव वाचवण्याचा कोणतेच चित्र दिसून येत नव्हते. रग्बी टीमच्या दोन खेळाडूंनी नंदो पॅराडो आणि रॉबर्ट कॅनेसाने हार मानली नाही. त्यांनी स्वत:सह इतर 14 जणांचा जीव वाचवला.
मृतदेह खाऊन राहिले जिवंत-
घटनेची माहिती मिळताच उरुग्वे सरकारने सक्रियता दाखवली आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले. परंतु प्लेनचा रंग पांढरा असल्याने बर्फाने झाकलेल्या अँडिजवर त्यांना शोधणे कठिण झाले होते. 11व्या दिवशी रेस्क्यू ऑपरेशन बंद करण्यात आले. त्यानंतर अडकलेल्या लोकांचे जगणे आणखी कठिण झाले. सुरुवातीला जिवंत राहिलेल्या लोकांनी उपलब्ध जेवण आपसाप वाटून घेतले. मात्र अन्न संपल्यानंतर या लोकांनी आपल्या सहकार्यांचे मृतदेह खाण्यास सुरुवात केली होती.
अखेर यश मिळाले
अँडिजच्या खडकांवर अडकलेले जास्तित जास्त लोक मृत्यूची वाट पाहत होते तर काही लोक मदतीच्या शोधात निघाले होते. अंगात अशक्तपणा असूनदेखील या लोकांनी 12 दिवस ट्रॅकिंग केली आणि चिली क्षेत्रात पोहोचले. येथे दोव लोकांनी रेस्क्यू टीमला आपल्या सहका-यांचे लोकेशन सांगितले. अशाप्रकारे या दोन्ही खेळाडूंनी स्वत:सह 14 जणांचे प्राण वाचवले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या घटनेची काही छायाचित्रे...