आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 वर्षांची ही तरुणी प्रत्येक पोस्टमागे कमवते 10 लाख रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्युयॉर्क- आपण सगळे सोशल मीडियावर पोस्ट टाकतो. त्यातून आपल्याला काही आर्थिक लाभ होतो... नाही ना... उलट आपल्या पोस्टला मिळालेल्या काही लाईक्स आणि कॉमेट्सच आपली कमाई असल्याचे समजतो. काही पोस्ट प्रमोट करायच्या असतील तर आपल्याच खिशातील पैसा खर्ची घालावा लागतो. पण एक अशी युवती आहे जी इंस्ट्राग्रामवरील प्रत्येक पोस्टमधून तब्बल 10 लाख रुपये कमवते. बसला ना धक्का.
डॅनिअल बर्नस्टीन असे या तरुणीचे नाव आहे. ती मॉडेल आणि फॅशन ब्लॉगर आहे. ती एक ब्लॉगही चालवते. इंस्ट्राग्राम, ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ती आपल्या पोस्ट शेअर करते. या मॉडेलला वेगवेगळ्या कंपनीकडून सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी पैसे मिळतात.
डॅनिअल इंस्ट्राग्रामवर क्लॉदिंग, शूज आणि अॅक्सेसरीज आदीसंदर्भात पोस्ट अपलोड करते. ती जवळपास सर्वच ब्रॅंडचे प्रमोशन करते. तिची प्रत्येक पोस्ट पैसे मिळवणारी असते. त्यासाठी तिने आधीच आर्थिक गणित तयार केले असते. ती न्युयॉर्क सिटीत राहते. सप्टेंबर 2011 पासून ती ब्लॉगिंग करीत आहे.
पुढील स्लाईडवर बघा, डॅनिअलने टाकलेल्या पोस्ट... विचार करा यातून तिला कसे होत असेल उत्पन्न...