ब्रिटनमधील लाँजरी मॉडेल कार्ला क्रेसी एका पोलमध्ये देशातील सर्वात आकर्षक महिला म्हणून निवडली गेली होती. नट्स आणि जू सारख्या प्रसिद्ध ब्रिटीश मॅगझिनच्या कव्हरवरही ती झळकली आहे. पण कार्लाला वयाच्या 25 व्या वर्षीच मॉडेलिंग सोडून घरी बसावे लागले आहे. त्यामागचे कारण म्हणचे तिचा आजार. या आजारामुळे तिला प्रचंड वेदना, अस्वस्थपणा, ब्लड लॉसचा सामना करावा लागतो. तीची अवस्था एवढी गंभीर आहे की, दर 6 महिन्यांनी तिला सर्जरी करावी लागते.
असे आहे प्रकरण...
- कार्लाला वयाच्या 14 व्या वर्षापासून वेदना, पिरियड्समध्ये हेवी ब्लिडींगची समस्या होती. पण डॉक्टरांना सुमारे 10 वर्ष तिच्या आजाराचे निदानच झाले नाही. बाऊल सिंड्रोम समजून तिच्यावर उपचार सुरू होते.
- पण अखेर कार्लाला अँडोमेट्रिओसिस असल्याचे समोर आले. त्याला फ्रोजन पेल्विसही म्हणतात. या अवस्थेत गर्भाशयाच्या बाहेरचे टिश्यू आतील भागाप्रमाणे काम करू लागतात.
- त्यामुळे ओव्हरी, फॅलोपियन ट्यूब, पोट आणि ब्लॅडरवर त्याचा वाईट परिणाम होतो. या आजारामुळे कार्लाच्या गर्भाशयाच्या आसपास अनेक सिस्टही तयार झाले आहेत.
- यामुळे तिचे यूटरस, बाऊल आणि आतडे एकमेकांना चिटकले आहेत. त्यामुळे कार्लाला प्रचंड वेदना होतात. पिरियड्स जास्त दिवस चालतात आणि हेवी ब्लिडींग होते.
- यावर एकमात्र उपाय म्हणजे सर्जरी हा आहे. सर्जरी केली नाही तर तिच्या आतील अवयवांवर वाईट परिणाम होऊ लागतो.
- या आजारामुळे कार्लाला करियर सोडून घरी बसावे लागले आहे. तिला कधीही पोटदुखी सुरू होते आणि अनेक दिवस ती कायम राहते. तिला मेकअपसाठीही बसता येत नाही, मग फोटोशूट आणि रॅम्पवॉक तर पार लांबची गोष्ट आहे.
- डॉक्टरांचे अशे म्हणणे आहे की, तिने यूटरस काढले तर तिला या सर्वापासून सुटका मिळेल. पण त्यामुळे तिला कधीही आई होता येणार नाही. वयाच्या 25 व्या वर्षी हा निर्णय घेणे तिच्यासाठी फारच कठीण आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कार्लाच्या मॉडेलिंगचे आणि आजारपणातील इतर काही PHOTOS..