आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Model Melynda Moon Has Surgery To Get Elf Ears As Fan Of Lord Of The Rings

जरा हटके दिसण्यासाठी या मॉडेलने चक्क बदलून घेतला स्वत:च्या कानांचा आकार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इतरापेक्षा जरा हटके दिसण्यासाठी सेलिब्रिटी केव्हा काय करतील याचा काही नेम नाही. आता हेच पाहा ना, कॅनडामधील एका मॉडेलने सर्जरीकरून चक्क कानांचा आकारच बदलून घेतला आहे.
ओंटारियोची 23 वर्षीय मॉडेल मिलिंडा मून हिने 'दी लॉर्ड ऑफ दी रिंग'ने प्रेरित होऊन स्वत:च्या कानाचा आकार बदलून घेतला आहे. यासाठी तिला 24 हजार रुपये खर्च आला. सर्जरी करून तिने कानांचा आकार बदलला आहे. सर्जरीमुळे तिला खूप त्रासही झाला होता.
बालपणापासून मिलिंडाला काल्पनिक कथा ऐकण्याचा छंद आहे. कथेतील मिलिंडा एल्फसारखे रुपडे आपल्यालाही लाभावे, असे तिला नेहमी वाटायचे. त्यामुळे तिने हेअर स्टाइलही बदलून घेतली होती. सर्जरी केल्यानंतर मिलिंडा खूप आनंदी आहे.
'दी लॉर्ड ऑफ दी रिंग'पासून प्रेरीत झालेल्या मिलिंडा मूनच्या अदा पाहण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...