आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या मॉडेलला मिळत आहेत बलात्काराच्या धमक्या, पायांचे केले असे शूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वीडनच्या या 26 वर्षीय मॉडेलला इंटरनेटवर धमक्या मिळत आहेत. लोक तिला उघडपणे बलात्कार आणि ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत. तिने एका जाहिरातीसाठी शूटिंग केली होती. नेमक्या याच व्हिडिओ शूटिंगमुळे तिला ह्या धमक्या दिल्या जात आहेत. असे काय आहे त्या व्हिडिओमध्ये ते जाणून घेऊया...
 

स्वीडनची मॉडेल आणि फोटोग्राफर अरविदा बिस्ट्रोमने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिल्याप्रमाणे, तिला बलात्कार आणि मर्डरच्या धमक्या मिळत आहेत. तिने नुकताच अॅडिडासच्या एका जाहिरातीसाठी केलेला व्हिडिओशूट पोस्ट केला. या जाहिरातीमध्ये तिच्या पायात बूट आहेत. मात्र, तिने पायांना वॅक्स केले नाही. व्हिडिओमध्ये तिच्या पायांवरील केस स्पष्टपणे दिसत आहेत. हे पाहताच लोकांनी तिला व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये शिवीशाप सुरू केली. सोशल मीडियावर तिला काहींनी माकड सुद्धा म्हटले. त्यातच काहींनी तिला इंस्टाग्रामवर थेट मेसेज करून बलात्कार आणि मर्डरच्या धमक्या दिल्या. कॉमेंट करणाऱ्यांपैकी काहींनी तिच्या धाडसाचे कौतुक केले. काहीही असो, या मॉडेलने नैसर्गिक सौंदर्य दाखवले आहे असे म्हणत लोकांनी तिची पाठराखण सुद्ध केली आहे. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, तिचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...