पाकिस्तानच्या लाहोर शहरामध्ये पंजाबी युवकांनी आयोजीत केलेल्या यूथ फेस्टिव्हलमध्ये मोहम्मद राशिद या युवकाने एका मिनीटात 155 अाक्रोटचा भुगा करून नवा इतिहास रचला आहे. या विक्रमासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली आहे. मार्शल आर्टमध्ये एक्सपर्ट असलेला तरूण म्हणून राशिद लाहोर शहरात ओळखला जातो.या अगोदर अशा प्रकारचा विश्वविक्रम अमेरिकेतील ऐश्रिता फरमॅनने एका मिनीटात 60 अाक्रोट फोडून केला होता. न्यूयार्कच्या फरमॅनने डोक्याला रूमाल बांधून हा विक्रम केला होता. राशिदने मात्र 155 अक्रोट फोडतेवेळी सुरक्षा म्हणून कशाचाही वापर केलेला नाही. राशिदने केलेल्या विश्वविक्राचा व्हिडिओ यू-ट्युब वर लोड करण्यात आला आहे.
पुढील स्लाईडवर भारतीय युवकाचा नाकाने टाइप करण्याचा विश्वविक्रम...