आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mohammed Khurshid Hussain Sets New World Record For Typing With His Nose

एका भारतीय तरुणाची कमाल, नाकाने टाइपिंग करून गिनीज बुकमध्ये नोंदवले नाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताने अलीकडेच एक अनोखा विक्रम रचला आहे. 22 वर्षीय हैदराबादचा रहिवासी मोहम्मद खुर्शीद हुसैन याने त्याच्या नाकाने सर्वात जलद गतीने टाइपिंग करण्याचा नवीन विक्रम रचून गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नाव नोंदवले.
पदवीधर खुर्शीदने गेल्या 27 फेब्रुवारी 2014ला आपल्या नाकाने 103 अक्षरांचे एक वाक्य 47.44 सेकंदात टाइप कण्याचा विक्रम रचला आहे. खुर्शीदने 107 अक्षरांनी बनलेले 17 शब्दांचे वाक्यसुध्दा पूर्ण टाइप केले. त्याने काही महिन्यापूर्वीच हे वाक्य 53 सेकांदांमध्ये पूर्ण केले होते. हा विक्रम अधिकारिकरित्या नोंद होण्यापूर्वीच त्याने हा एक दुसरा विक्रम रचून नाव कमवले आहे.
नाकाने टाइपिंग करण्याचा पहिला विक्रम अनिवासी भारतीय महिला नीताने रचला होता. तिने 2008मध्ये नाकाने 1 मिनीट 33 सेकंदामध्ये एक वाक्य टाइप करण्याचा अनोखा विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले होते. नीता साउथ अरबमध्ये राहत होती.
खुर्शीदने रचला जगातील सर्वात जलद गतीने टाइपिंग करण्याचा विक्रम
मोदम्मद खुर्शीदने 2 फेब्रुवारी 2012मध्ये हैदराबादमध्ये सरदार पटेल ऑडिटोरिअममध्ये सर्वात कमी वेळेत 3.43 सेकंदात इंग्रजी शब्द टाइप करून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड बनवला आहे. हैदराबादमध्ये हा कार्यक्रम सकाळी 10:45 वाजता सुरू झाला होता.
सात वर्षांचा असतानाच टाइपिंग शिकण्यास केली होती सुरूवात
खुर्शीद केवळ सात वर्षांचा होता तेव्हापासून टाइपिंग करतो. त्याची आई शिक्षिका असल्याने त्याला त्यांनी इंग्रजी टाइपिंगचे धडे दिले. खुर्शीद वडील अकबर हुसैन आणि आई कुदैशिया यांच्यासोबत हैदराबादच्या अमर नगरमध्ये राहतो.
या अनोख्या विक्रमची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा....