आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईने स्वत:च्याच मुलाला जिवंत जाळले, एका संशयामुळे केली हत्या...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक मुलाच्या आयुष्यात आई खुप महत्वाची असते. आई मुलाला जन्म देते, त्याला मोठ करते, त्याच्यावर प्रेम करते आणि त्याच्यासाठी सर्वकाही करते. परंतु, अमेरिकेत एका आईने आपल्या चार वर्षाच्या मुला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे.

या कारणामुळे उचलले असे पाऊल...
एमेलिया डिस्टासिओने आपला चार वर्षाचा मुलगा अंटोनिओला बाथटबमध्ये 7 बेल्टांनी बांधून जिवंत जाळले. आपला मुलगा माणसाचे मास खातो असी एमेलियाला वाटले होते. पोलिस घटनास्थळी पोहेचेपर्यंत अंटोनिओ पुर्णपणे जळाला होता. शेजाऱ्यांनी सांगितले की, एक दिवसापूर्वी मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. मम्मी प्लीच मला सोडून दे, मी आता असे नाही करणार असे तो ओरडत होता. दुसऱ्याच दिवशी घरातून जळाल्याचा वास आला. त्यानंतर त्यांनी पोलीसांना बोलवले...

आता कुठे आहे आई...?
डिटेक्टिव्सनी तपास केल्यानंतर समोर आले की, हत्त्येपूर्वी एमेलियाने फोनवरील इंटरनेटवर 'नरभक्षकाला कसे मारावे?' असे सर्च केले होते. सध्या पोलीसांनी एमेलियाला अटक केली असून ती जेलमध्ये आहे. तिची मानसीक स्थिती ठिक नसल्याचे तिच्या पतिने सांगितले, तसेच मुलाला स्वर्गात जागा मिळावी यासाठी ती आता प्रार्थना करत आहे.

पुढील स्लाइडवर पाहा बातमीशी संबंधित फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...