आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mom Had An Epic Living Room Dance Sesh With Her Daughter

आठ महिन्यांची गरोदर महिला मुलीसोबत करते चक्क Dance,व्हिडिओ झाला व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्बनडेल- आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेला व्यवस्थित चालता येत नाही. या काळात ती बेड रेस्ट घेत असते. परंतु, आठ महिन्यांच्या गरोदर महिलेने चक्क तिच्या मुलीसोबत डान्स केला. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, परंतु हे खरे आहे.

सोशल साइट फेसबुकवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आठ महिन्यांची गरोदर महिला चक्क तिच्या मुलीसोबत डान्स करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. अवघ्या चार दिवसांत हा व्हिडिओ सुमारे 2 कोटी 25 लाख युजर्सनी पाहिला आहे. निक्की टेलर नामक महिलेचा हा व्हिडिओ आहे.

निक्की टेलरने हा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला आहे. तीन मिनिटांच्या या व्हिडिओत निक्की आणि तिच्या सहा वर्षीय मुलगी जॅलिनने रॅपर सारलेंलेंटोचा 'वाच मी' या गाण्यावर डान्स करत आहे. निक्की ही अमेरिकेनतील इलिनोइस प्रांतातील कार्बन डेल सिटीमधील रहिवासी आहे.
निक्कीने सां‍गितले की, मुलीसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ पतीला पाठवायचा होता. तो ऑफिसात गेला होता. परंतु, नंतर तिचा मूड बदलाला आणि तिने 'फेसबुक'वर व्हिडिओ अपलोड केला. पाहाता-पाहाता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चार दिवसांत 6 लाख युजर्सनी हा व्हिडिओ शेयर केला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, मुलीसोबत डान्स करताना आठ महिन्यांची गरोदर निक्कीचा व्हिडिओ आणि फोटो...