आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Moment Adolescent Elephant Fought Off Attack By 14 Lions Who Tried To Eat Him

हत्तीच्या पिल्लाने 14 सिंहिणींना सळो की पळो करून सोडले, पाहा कसा वाचवला स्वत:चा जीव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हत्तीची शिकार करताना सिंहिण)
सिंह कधीच आपली शिकार कोणत्याही परिस्थितीत सोडत नाही. परंतु अनेकदा त्याला हार मानावी लागते. कधी-कधी छोट्या-छोट्या प्राण्यांकडून त्याला मात खावी लागते. कधी तो जंगली म्हशींसमोर झुकतो तर कधी एक छोटा साळींदरही त्यांना मात देतो. असचा प्रसंग अफ्रिकेच्या जाम्बियाच्या दाक्षिण लुआंगवा नॅशनल पार्कमध्ये घडला. येथे 14 सिंह-सिंहिणींनी एका 8 वर्षांच्या हत्तीच्या पिल्लावर हल्ला.
यावेळी हत्तीचे पिल्लू त्या सिंह-सिंहिणींच्या तावडीतून वाचण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याच्यावर एक-एकाने हल्ला करण्यास सुरुवात केली. मात्र हत्तीचे पिल्ली त्यांच्या तावडीतून मुक्त होण्यात यशस्वी झाला. तीन मीनिटांपर्यंत चालू असलेल्या या भांडणात सुरुवातीला सिंहिणीने या हत्तीच्या पिल्लाला चारही बाजूंनी घेरले होते. हत्तीने पळ काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी त्याच्यावर हल्ला केला.
हत्ती जेव्हा त्यांच्यावर हल्ला करायचा तेव्हा सिंह मागून त्याच्यावर वार करत होते. जवळच्या नदीत जाऊन हत्तीने आपला जीव वाचवला. त्यावेळी सिंहिणी त्याची शिकार करण्यासाठी बाहेर वाट पाहत राहिल्या. हत्तीनेसुध्दा त्यांना सळो की पळो केले.
या घटनेला न्यूयॉर्कचा पत्रकार जेस्से नाशने पाहिले. त्याने सांगितले, 'मला हत्तीला वाचवण्याची इच्छा होत होती. परंतु ते निसर्गाच्या नियमाला तोडण्यासारखे होते. त्यावेळी आम्ही प्रेक्षकाच्या रुपात सफारीमध्ये बसलेलो होतो. या सर्व घटनाक्रमाची छायाचित्रे एका पर्यटकाने क्लिक केली.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हत्ती आणि सिंह-सिंहिणींमध्ये झालेली भांडणाची छायाचित्रे...