आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Monkey Perform Waiters Work In Japanese Restaurant

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जपानच्या या रेस्तरॉंत नटखट वानर करतात वेटरचे काम, वाढतात सुग्रास जेवण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो- असे म्हटले जाते, की बुद्धीचा विषय असेल तर वानर मनुष्याच्या सर्वांत जवळचा प्राणी आहे. तुम्हाला ही बाब साक्षात बघायची असेल तर जपानची राजधानी टोकियोत असलेल्या काबुकी रेस्तरॉंत जावे लागेल. या रेस्तरॉंत वेटरचे काम माणूस नव्हे तर चक्क वानर करतात. हे वानर केवळ जेवण आणत नाहीत तर ऑर्डर घेतात आणि जेवण वाढतातही. त्यांना वेटरप्रमाणे गणवेश देण्यात आला आहे. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे.
वेटरचे काम वानर करीत असल्याने या रेस्तरॉंची खुप चर्चा होते. जेवण करायला नव्हे तर वानरांची सर्व्हिस बघण्यासाठी काही ग्राहक येथे येतात. याची सुरवात अशी झाली, की या रेस्तरॉंच्या मालकाकडे पाळीव वानर होते. ते मालकाचे अनुकरण करायचे. तेव्हा त्याला ही शक्कल सुचली. आणि ती यशस्वीपणे अंमलात अणण्यात आली आहे.
या रेस्तरॉंत येट चेन आणि फुकू चेन हे दोन वानर 2008 पासून वेटरचे काम करीत आहेत. यातील चेन वयाने मोठा आहे. एखादा कस्टमर रेस्तरॉंत आल्याबरोबर दोघे कामाला लागतात. एक वानर चेअर घेऊन जातो तर दुसरा हात पुसण्यासाठी टॉवेल देतो. त्यानंतर एक वानर ऑर्डर घेतो तर दुसरा जेवण वाढतो.
पुढील स्लाईडवर बघा, जपानी रेस्तरॉंत कसे काम करतात हे दोन वानर...