आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

80 वर्षांत पहिल्यांदा चुकीने पकडल्या गेला महाकाय शार्क, 21 फुट आहे लांब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ऑस्ट्रेलियामध्ये सापडलेला भला मोठा शार्क)
मेलबर्न- ऑस्ट्रेलियाच्या पोर्टलँडच्या समुद्रामध्ये मागील जवळपास ८० वर्षांदरम्यान पहिल्यांदा एक भलामोठा शार्क सापडला. त्याची लांबी 21 फुट आहे. जहाज चालवत असलेला जेम्स ओव्हन आणि त्याच्या क्रू मेंबरने चुकीने या शार्कला व्हिक्टोरिआमध्ये पकडले. मात्र त्यांनी याला विकण्याऐवजी संशोधनासाठी सायन्स म्यूझिअममध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. याचे वजन जवळपास ३ टन आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये 1930च्या दशकात एवढा मोठा शार्क पाहिल्या गेला होता. या शार्कला सायन्टिस्ट्स क्रेनने उचलण्यात आले. त्यानंतर त्याला कापण्यात आले आणि त्याचे तुकडे करण्यासाठी जवळपास 5 तास लागले.
एकदा 1883मध्येसुध्दा पोर्टलँडमध्ये महाकाय शार्क पकडण्यात आला होता आणि त्याची त्वचा, दांतसुध्दा म्यूझिअममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. म्यूझिअमचे सीनिअर कलेक्शन मॅनेजर डिन्ने ब्रेने सांगितले, की 21 फुट शार्कवर होणारे संशोधन नवी माहिती पुढे आणू शकते. त्यांनी एका न्यूज चॅनलला सांगितले, की या अनोखे शार्कच्या अभ्यासासाठी वैज्ञानिक उत्सूक आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या महाकाय शार्कचे PHOTOS...