आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'Monster\' Redheaded Centipede That Is Capable Of Catching A BAT

ही गोम विषारी पायाने करते शिकार अन खाते साप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील टेक्‍सासमध्‍ये आढळून आलेली लालसर रंगाची 'गोम' - Divya Marathi
अमेरिकेतील टेक्‍सासमध्‍ये आढळून आलेली लालसर रंगाची 'गोम'
टेक्‍सास - अमेरिकेतील टेक्‍सासमध्‍ये एक लालसर रंगाची 'गोम' आढळून आली आहे. ही गोम साप, बेंडुक खाते ऐवढेच नव्‍हे तर आपल्‍या विषारी पायाने वटवाघुळाची पण शिकार करते. ही गोम टेक्‍सास कोकनमधील गार्नर स्‍टेट पार्कमध्‍ये आढळून आली आहे. सर्वसामान्‍य गोमच्‍या तुलनेत ही गोम खुप मोठी आहे. या गोमचा फोटो टेक्सास पार्क्स अण्‍ड वाइल्डलाइफ डिपार्टमेंटने फेसबुकवर पोस्‍ट केला होता. त्‍यानंतर हा फोटो व्‍हायरल झाला.
वाइल्डलाइफ डिपार्टमेंटच्‍या बेन हचिंस यांनी सांगितले की, ही गोम साप, बेंडुक, वटवाघुळ खाते तसेच या गोमने माणसांना जर चावा घेतला तर धोका होउ शकतो. गोम चावलयाने माणस मरत नाहीत परंतु तिच्‍या विषामुळे लीव्‍हर, किडनी फेल होउ शकते. तसेच -हृदय विकाराचा झटका पण येत असल्‍याचे हचिंस यांनी सोगितले.
युनिवर्सिटी ऑफ अर्कासस अर्थरोड म्‍युझियमच्‍या अधिका-यांनी सांगितले की, ही गोम खुप गतिने चालते व खुप विचीत्र प्रवृतीची आहे. आतापर्यंत टेक्‍साससह अर्कासस, मिसौरी, लुईसियाना, कंसास, ओकलाहोमा, न्‍यु मेक्सिको, आणि एरिजोनामध्‍ये आढळून आली आहे. या गोमची लांबी जवळपास 17 सेंटीमिटर आहे व 21 ते 23 जोड पाय आहेत. अशा स्‍वरूपाची गोम भारतात पण अनेक‍ ठिकाणी आढळून येते.
अमेरिकेतील टेक्‍सासमध्‍ये आढळून आलेली लालसर रंगाच्‍या 'गोम'चे फांटो पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिककरा