आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mother And 4year Old Daughter Take Adorable Pictures Of Yoga

PHOTOS: 4 वर्षांची ही चिमुरडी हटके पोजमध्ये करते आपल्या आईसोबत योगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः योगा करताना न्यू जर्सीची लौरा आपली चार वर्षांची मुलगी मिनीसोबत)
चार वर्षांची मिनी, कधी आईच्या हातांना आपल्या चिमुकल्या हातांमध्ये उचलते, कधी स्वतःच्याच हातातवर उभी होते, तर कधी डोक्यावर उभ्या झालेल्या आपल्या आईच्या पायांवर बसते. बघताना ही कसरत वाटेल, मात्र खरं तर हा योगाचा एक भाग आहे. न्यू जर्सीची रहिवाशी असलेली चार वर्षांची ही मिनी आपली आई लौरासोबत योगा करताना हटके पोज देते. तिच्या या पोज बघून बघणारे नक्कीच अचंबित होतात.
मिनीची आई आणि योगा एक्सपर्ट लौरा केसपरजक यांनी सांगितले, ''माझी चार वर्षांची मुलगी मिनीला माझ्याप्रमाणेच योगात रुची असल्याचे हळूहळू माझ्या लक्षात आले. त्यानंतर आम्ही दोघींनी एकत्र योगा करायला सुरुवात केली. यादरम्यान तिने माझ्यासारख्या पोज दिल्या. मिनी कॅमे-यासमोर उत्कृष्ट योगा करते. तिची योगा करतानाची काही छायाचित्रे इंस्टाग्रामवर पोस्ट केलेली असून आत्तापर्यंत लाखो लोकांनी ती पाहिली आहेत.''
लौरा मागील 17 वर्षांपासून योगा क्लासेस घेत आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. चार वर्षांची मिनी योगात पारंगत झाली आहे. मुलगा अद्याप लहान आहे, मात्र तोसुदधा योगाची पोज देतो.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा खास अंदाजात योगा करतानाची आई-लेकीची ही खास छायाचित्रे...