आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेने केला दावा- 5 वर्षांच्या मुलीना खाल्ले सगळे घर, जाणून घ्या काय झाले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही मुलांना चॉकलेट, बिस्किट खातांना बघितले असेल. पण इंग्लंडच्या डरबे परिसरात राहणाऱ्या या पाच वर्षांची मुलगी फराह हिने संपूर्ण घर खाल्ले आहे. होय, हे तिच्या आईचे म्हणणे आहे. २९ वर्षांची क्लेरा बेट्स हिने खुलासा केला आहे, की फराहने घरातील भींतींसह कारपेटही खाल्ले आहे.
 
जाणून घ्या काय आहे प्रकरण
क्लेरा यांनी सांगितले, की फराह जेव्हा १० महिन्यांची होती तेव्हापासून ती घरातील सामान खात आहे. विशेष म्हणजे ती घरातील कपडे, भींत आणि फर्निचर फारच सहजपणे खाते आणि डायजेस्टही करते. त्यामुळे मला दोनदा घर बदलावे लागले आहे. एवढेच नव्हे तर घराच्या नुतनिकरणासाठी मोठी रक्कम चुकवावी लागली आहे.
 
एक दिवस फराहच्या लहान भावाचा शुज गायब झाला होता. क्लेरा यांनी शुज खुप शोधला. पण त्यांना तो सापडला नाही. त्यांचा संशय फराहवर गेला. तेव्हा तिला आश्चर्य वाटले, की फराहने शुज कसा काय डायजेस्ट केला असेल. काही दिवसांनी क्लेरा फराहला डॉक्टरकडे घेऊन गेल्या. तेव्हा त्यांना धक्काच बसला.
 
असा आहे आजार
फराहच्या या सवईने कुटुंबीय हैराण झाले आहेत. डॉक्टरांनी तिला तपासले तेव्हा धक्काच बसला. पिका नावाच्या आजाराने ती ग्रस्त आहे. या आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण काहीही करतात. या आजारामुळे रुग्णांचा काही काळातच मृत्यू होतो. विशेष म्हणजे त्यावर कोणताही उपचार नाही.
 
पुढील स्लाईडवर बघा... फराहचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...