आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mother Shared Babies Umbilical Cord Photos Awaring People About Life Threatening Pregnancy Condition

या महिलेच्या गर्भात होती ही भयावह गोष्ट, जन्माला येण्याअगोदरच गेला असता मुलीचा जीव..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवन आणि मृत्यू याचा निर्णय माणूस कधीच घेऊ शकत नाही. मरण जेव्हाही यायचे असेल तेव्हा ते येतेच. एबरडीन येथे राहणाऱ्या एका 28 वर्षीय रेबेका मेलड्रम या महिलेने नुकतेच इन्सटाग्राम अकाउंटवक काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिने तिच्या गर्भात वाढणाऱ्या एका भयानक गोष्टीकडे सर्वांचे लक्ष पोहचवले. करायचे होते लोकांना जागृत..
 
रेबेकाने पोस्ट केलेल्या फोटोकडे लोकांचे लक्ष गेले. जेव्हा रेबेकाने एका मुलीला जन्म दिला होता तेल्हा तिच्या गर्भनाळीमध्ये पीळ बसला होता. याला वैद्यकीय भाषेत ट्रू नॉट म्हटले जाते. यामुळे बाळाचा गर्भातच मृत्यू होऊ शकतो. जेव्हा तिला या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा तिने इतर पालकांना जागरुक करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या गर्भनाळीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या नॉटमुळे मुलाच्या डोक्याला कायमची जखम होऊ शकते. विशेष म्हणजे याविषयी प्रेग्नेंसीदरम्यान काहीच कळत नाही. 
 
हे असते गर्भनाळीचे काम...
रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टट्रिशन्स एंड गाइनेकोलॉजिस्टचे स्पोक्सपर्सन डॉ. पैट्रिक ओब्रिएन यांनी सांगितले की या गर्भनाळीद्वारे बाळाला ऑक्सीजन आणि इतर गरजेचे न्युट्रीएंट्स पोहोचतात. अऩेकदा अरसे पाहिले गेले की जेव्हा गर्भनाळीला गाठ पडते तेव्हा मुले मरतात. 
 
लाइवस्ट्रीम केला होता मुलीचा जन्म...
अगोदरच दोन मुलांची आई असलेल्या रेबेकाने तिच्या डिलीव्हरीचा व्हिडिओ लाईव्ह केला होता. तिच्या अनेक फॉलोअर्सने मुलाला जन्म देताना पाहिला होता. सिझेरीअनने जन्म झालेल्या मुलीचे वजन दोन किलो होते. जन्म झाल्यावर मुलीला केअर युनिटमध्ये शिफ्ट करण्यात आले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अन्य फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...