काळजाचा ठोका चूकला म्हणजे मरण जवळून पाहिले असे म्हटले जाते. फ्लोरिडा देशामध्ये मात्र आजब प्रकार घडला आहे. एका महिलीच्या हृदयाची धडधड चक्क 45 मिनिट थांबली. हा बाका प्रसंग बोकोराटोलच्या हॉस्पिटलमध्ये महिलेची डिलेवरी करते वेळी घडला.
40 वर्षांच्या रूबी क्राउपेरा कॅसिमिरोचे सिजर केल्यानंतर आम्ही फक्त बाळाला वाचऊ शकलोत. ऑपरेशन करते वेळी बाळाच्या शरिरावचा तेलकट पदार्थ रूबीच्या रक्तात गेल्यामुळे ती बेशुद्ध पडली. तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्यामूळे रूबीने प्राण सोडल्याची माहिती डॉक्टरांनी रूबीच्या नातेवाईकांना दिली. डॉक्टरांनी मृत घोषीत केल्यानंतर तब्बल 45 मिनिटाने रूबी नावाची महिला शुद्धीवर आली. हा प्रकार पाहून हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर आणि रूबीचे नातेवाईक आवाक झाले.
पुढील स्लाईडवर पाहा मृत्यूच्या दारातून परत आलेल्या महिलेचे फोटो...