अमेरिकेच्या कोलंबियामध्ये तरुण आणि तरुणी एकत्रितपणे मड बाथ करतात. येथील मातीमध्ये अनेक प्रकारचे गुण असल्याने त्यात आंघोळ केल्याने आरोग्यासाठी लाभदायक ठरते असे मानले जाते. कोलंबियामध्ये कॅठलिनाच्या जवळ ही जागा आहे. फोटोमध्ये दिसणारे लोक जवळपास 15 मीटर खोल खड्ड्यात चिखलात आहेत. याला अल टोटुमो मड वोल्कॅनो असेही म्हटले जाते. यातील चिखल किंचित गरम असतो.
फोटो - मड बाथ करताना तरुण आणि तरुणी
पर्यटकांमध्येही लोकप्रिय
एवढेच नाही तर हा चिखल अशा प्रकारचा असतो की तुम्हाला खोलीला घाबरण्याची गरज नाही. त्याचे कारण म्हणजे कोणत्याही स्थितीत तुम्ही चिखलात फसत नाहीत. कारण तुमच्या शरिराचा एक भाग पूर्णपणे चिखलाबाहेर असतो. येथील पर्यटकांमध्येही ते लोकप्रिय आहे. स्थानिक लोक पर्यटकांची मदतही करतात. नंतर पर्यटकांचे कपडेही स्वच्छ करून देतात.
पुढील स्लाइज्सवर पाहा, या अनोख्या BATH चे आणखी 6 फोटो...