आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Follow me' म्हणत हे दाम्पत्य करतय जगभर प्रवास, PHOTO झालेत वायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मास्कोच्या एका जोडपे मागील पाच वर्षापासून जगभर प्रवास करत आहे. नुकतेच हे जोडपे भारतातील विविध शहरांना भेटी देत आहे. यामध्ये जगप्रसिध्द ताजमहाल असलेला आग्र्याचाही समावेश आहे. या फोटोग्राफर जोडप्याने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांचे काही फोटोज अपलोड केले आहेत. हा ताजमहालचा काढण्यात आलेला फोटो अनेक लोकांना खुपच आवडला आहे. या जोडप्याने 'फॉलो मी' नावाने एक सिरीज पोस्ट केली आहे. जी मोठ्या प्रमाणात वायरल झाली आहे. जगभरातील विविध पर्यटन स्थळावर एकमेकांचे हात पकडून क्लिक केलेले हे फोटो लोकांना खुपच आवडत आहेत.
यामधील पती मुराद ओस्मान हे त्यांची पत्नी नतालिया जखरोवा यांचा हात पकडून त्यांना फॉलो करत आहेत आणि हाच क्षण त्यांनी कॅमेर्‍यात कैद केला आहे. इंस्टाग्रामवर या जोडप्याचे 22 लाख फॉलोवर आहेत. फेसबुकवरही ‘फॉलो मी’ नावाने एक पेज बनवण्यात आले आहे, ज्याला आतापर्यंत एक लाखपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. या जोडप्याचा हा प्रवास अजून सुरूच आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, या कपलचे Follow me सीरीजमधील इतर काही PHOTOS...