आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nancy And Charlie McLean Heart Touching Photo Shoot With New Born Son Edison

बाळ दोनच दिवस जगले.. आई वडिलांनी टिपून ठेवल्या वेदना अन् असंख्य Memories

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या एखाद्या अतिशय जवळच्या व्यक्तिला कायमचा निरोप देताना एखाद्याची अवस्था काय होत असेल, याचा विचार न केलेलाच बरा. हा अतिशय दुःखद क्षण असतो, जेव्हा आपली लाडकी व्यक्ती आपल्यातून कायमची निघून जाते. असेच काहीसे घडले नवदाम्पत्य नॅन्सी आणि चार्ली मॅकलिन यांच्यासोबत. त्यांच्यावर आपल्या नवजात बाळाला कायमचा निरोप देण्याची दुर्दैवी वेळ आली.
झाले असे, की नॅन्सी आणि चार्ली यावर्षी 24 जानेवारी रोजी लग्नगाठीत अडकले. लग्नाच्या वेळी नॅन्सी प्रेग्नेंट होती. अलीकडेच तिने मुलाला जन्म दिला. मात्र बाळाच्या आगमनाचा आनंद काही क्षणातच दुःखात बदलला. डॉक्टरांनी त्यांच्या तीन दिवसाच्या नवजात बाळाला अतिशय दुर्मिळ आजार झाल्याचे सांगितले. आपले बाळ तीन दिवसांपेक्षा अधिक काळ जगू शकणार नाही, हे कळताच नॅन्सी आणि चार्ली यांच्या पायाखालची जमीनच सरकली. नॅन्सी आणि चार्ली यांनी धीर एकवटवून आपल्या बाळासोबतचा प्रत्येक क्षण जपून ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या लाडक्या बाळाचे नाव एडिसन असे ठेवले.

त्यांनी त्यांचा वेडिंग फोटोग्राफर जेम्स डेला एक खास फोटोशूट करण्याची विनंती केली. जेम्स यांनी चिमुकला एडिसन आणि नॅन्सी -चार्ली यांची अतिशय हृदयस्पर्शी छायाचित्रे आपल्या कॅमे-यात बंदिस्त केली. जेम्स यांनी एका मुलाखतीत सांगितले, ''या तिघांची छायाचित्रे काढताना मला खूप रडू कोसळले. नॅन्सी आणि चार्ली आपल्या चिमुकल्यासोबतचा प्रत्येक क्षण अनुभवत होते. क्षणोक्षणी त्यांचे डोळे पाणावले होते. ते दोघेही आपल्या बाळाचे प्रचंड लाड करत होते.''
दुःख थोडे बाजुला सारुन नॅन्सी आणि चार्ली यांनी आईवडील होण्याचा आनंद अनुभवला. हे फोटोशूट पार पडल्यानंतर दोन दिवसांनीच चिमुकला एडिसन हे जग सोडून कायमचा निघून गेला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन तुम्हीही पाहा, नॅन्सी आणि चार्लीची चिमुकल्या एडिसनसोबतची हृद्यस्पर्शी छायाचित्रे...