आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nasa Reveals Earth Becomes A Brighter Place During Festivals

PHOTOS: सण-उत्‍सवात 50 टक्के चाककतो मिडल ईस्‍ट-अमेरिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आनंदी जीवन जगण्‍यासाठी जगभरात विविध प्रकारचे सण साजरे केले जातात. दिवाळी असो किंवा ईद, ख्रिसमस या सणा निमित्त जगभर रोषणाई केली जाते. भारत, लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क, सिंगापूर, बर्लिन आणि टोकियो सारख्‍या देशाबरोबर इतर देशातही सन-उत्‍सवाच्‍या निमित्ताने केलेल्‍या रोषणाईमुळे जग आणखी सुंदर दिसते याची प्रचिती नासाला आली आहे. ख्रिसमस, ईद, दिवाळी आणि नववर्षाच्‍या निमित्ताने 50 टक्के रोषणाईची वाढ होत असल्‍याचा दावा नासाने केला आहे. यामध्‍ये सर्वात जास्‍त रोषणाई मिडल ईस्‍ट आणि अमेरिकेत असते. नासाने सुओमी एनपीपी सॅटेलाईटच्‍या माध्‍यमातून मिळवलेल्‍या माहितीच्‍या आधारावर हा दावा केला आहे. या दाव्‍या नुसार सण-उत्‍सवाच्‍या काळात पृथ्‍वीवर नेहमीपेक्षा 20 ते 60 टेक्के रोषणाई वाढलेली असते.

अल्‍गोरिदमचा केला वापर-
हे विश्लेषण करण्‍यासाठी नासाने गोडार्ड स्‍पेस फ्लाइट सेंटरने विकसित केलेल्‍या अ‍ॅडव्‍हान्‍स अल्‍गोरिदम पद्धतीचा वापर केला आहे. या पद्धतीमध्‍ये चंद्राचा प्रकाश, हवा आणि ढगांमधील प्रकाशकणांना फिल्‍टर करून हे फोटो घेण्‍यात आले आहेत. या विश्लेषणानूसार ख्रिसमसच्‍या निमित्ताने जगभरात जास्‍त रोषणाई केली जात आसल्‍याचे आढळून आले.
पुढील स्‍लाईडवर पाहा नासाने घेतलेली पृथ्‍वीचे छायाचित्रे...