आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघांच्या भांडणापासून ते उद्ध्वस्त शहरापर्यंत, NAT GEO कॉन्टेस्टमध्ये आल्या PHOTO ENTRY

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(NAT GEO READERS AWARD मध्ये विजयी ठरलेल्या फोटोंचा कोलाज )

नॅशनल जिओग्राफीक रीडर्स फोटो कॉन्टेस्ट 2014 मध्ये यावेळीसुध्दा हजारो फोटोएन्ट्रीज आली आहेत. यामध्ये अनेक फोटोंना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. या कॉन्टेस्टच्या ग्रँड प्राईज हाँगकाँगच्या ब्रायन येन यांना मिळाला आहे. त्यांचा अवॉर्ड विनिंग फोटोमध्ये लोकांनी भरलेल्या रेल्वेत एक महिला तिच्या स्मार्टफोनमध्ये गुंग आहे आणि या स्मार्टफोनचा लाईट तिच्या चेहऱ्यावर पडला आहे. यामध्ये या एकाच फोटोमध्ये प्रौद्योगिकी आणि आधुनिक जीवनचा प्रभाव दिसून येतो. या फोटोसाठी ब्रायन यांना 6 लाख 33 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
नॅशनल जिओग्राफीक चॅनल प्रत्येक वर्षी रीडर्ससाठी फोटो कॉन्टेस्टचे आयोजन करते. यंदा 2014 मध्येही या कॉन्टेस्टचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जगभरातील जवळपास 150 पेक्षा जास्त देशातील लोकांनी 9200 पेक्षा जास्त फोटो एन्ट्री पाठवल्या होत्या. यामध्ये एकमेकांशी भांडणारे वाघ, शिकाराच्या शोधात असलेला घुबड, मोठ्या संख्येने नदीत उडी मारताना रानगाय, वादळातून वाचणारा व्यक्ती, चिखलात लोळलेले लोक यांसारखे अनेक फोटो पाठवण्यात आले.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, या स्पर्धेत वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पुरस्कारप्राप्त फोटो...