आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Man Plans To Marry Woman He Met Online But Get Shock When He Discovers True Identity

ऑनलाइन जुळले प्रेम, पण लग्नाच्यापूर्वी स्टोरीमध्ये आला एक मोठा ट्विस्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल साइट्सवर रोज लोक नवनवीन मित्र बनवत असतात. एवढेच नाही तर लोक एकमेकांना न पाहता, न भेटता किंवा समजून न घेता प्रेमात पडतात. अनेकदा असे प्रेम यशस्वीही होते. पण बऱ्याच वेळा लोकांना अशा प्रेमापायी सर्वकाही गमवावे लागले. नुकतेच असे एक प्रकरण समोर आले. एक भारतीय तरुण सोशल साईटवर एका विदेशी मुलीच्या प्रेमात पडला. पण जेव्हा त्याला सत्य समजले तेव्हा त्याला धक्काच बसला. 

असे आहे पूर्ण प्रकरण..
- हा भारतीय तरुण कोण आहे आणि त्याचे नाव काय याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. 
- एका वेबसाईटनुसार 28 वर्षांचा हा तरुण इन्स्टाग्रामवर असलेल्या कॅरोल ब्राऊन (Carrol Brown) नावाच्या मुलीचा फोटो पाहून तिच्या प्रेमात पडला. 
- तरुण तिला फॉलो करू लागला आणि हळू हळू दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले. 
- दोघे मॅसेंजर आणि व्हॉट्सअपवरही गप्पा मारू लागले. 
- त्या व्यक्तीने सांगितले की, Carrol त्याच्यावर प्रेम करू लागली होती, आणि तिला त्याच्याशी लग्न करायचे होते. 
- त्याने कॅरोलला प्रपोज केले आणि तीही तयार झाली. 
- तो म्हणाला त्याने कॅरोलला लग्नाबाबत सांगितले तेव्हा तिने डायमंड रिंगची डिमांड केली. पण त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने पैसे कमावण्यासाठी दोन नोकऱ्या करायला सुरुवात केली. 
- यादरम्यान जेव्हा त्या मुलाच्या घरचे लग्नाबाबत बोलायचे तेव्हा तो विषय टाळायचा. 

असा झाला खुलासा 
- तरुणी कॅरोलला जेव्हा बोलण्यासाठी किंवा व्हिडीओ कॉलिंगबद्दल बोलायचा तेव्हा ती काहीतरी कारण सांगून त्याला टाळत होती. 
- दरम्यान करॉलने त्याच्याबरोबर ऑनलाइन बर्थडे साजरा केला आणि त्याला केकचा फोटोही पाठवला. त्याच्याकडे तिने गिफ्टही मागितले. 
- प एवढं सर्व करून जेव्हा तो भेटण्याबाबत बोलला तेव्हा त्याने तिला टाळले. त्यानंतर तरुमाना संशय आला. 
- नंतर त्याला समजले की तो मुलगी समजून ज्या अकाऊंटवर चॅटिंग करून गप्पा मारायचा ते फेक अकाऊंट होते. 
- अधिक चौकशी केल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, फेक प्रोफाइलद्वारे त्याला लुटण्याचा प्रयत्न केला जात होता.
- नंतर ते प्रोफाईलही डिलीट करण्यात आले. 

पत्ता आणि नंबर वेगवेगळे.. 
पुढील स्लाइड्सवर आम्ही जे फोटो तुम्हाला दाखवणार आहोत त्यात मुलीच्या प्रोफाइलवर असलेला पत्ता मियामी, फ्लोरिडा असा आहे. पण नंबर नायजेरियाचा आहे. तरुणाने जेव्हा तिला कुठली आहे असे विचारले तेव्हा तिने वेस्ट साउथ आफ्रिका म्हटले होते.

पुढील स्लाइड्सवर दोघांमधील चॅटद्वारे समजून घ्या संपूर्ण प्रकरण.. 
बातम्या आणखी आहेत...