आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nine Year Old Rape Victim Gives Birth To Daughter In Mexico

STRANGE: मॅक्सिकोत नऊ वर्षीय मुलगी बनली आई!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आश्चर्य वाटेल परंतु हे सत्य आहे. मॅक्सिकोमध्ये एक मुलगी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षीच आई बनली आहे. तिने गेल्या काही दिवसांपूर्वी एका चिमुरडीला जन्म दिला होता. ही मुलगी तिच्या वयाच्या आठव्या वर्षी गर्भवती झाली होती. तिच्यावर एका 17 वर्षीय तरुणाने बलात्कार केला होता. परंतु संबंधित तरुण सध्या फरार आहे. त्याचे नाव पीडित मुलीला ठाऊक आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, 27 जानेवारीला जोकिपान रुग्णालयात या मुलीने एक मुलीला जन्म दिला होता. बाळ आणि बाळंतीण सुखरुप आहेत परंतु कमी वयात ही मुलीने एका बाळाला जन्म दिल्याने तिची काळजी घेण्याची गरज असल्याचेही डॉक्टारांनी सांगितले आहे.

दरम्यान, यापूर्वी कोलंबियामध्ये 10 वर्षाच्या मुलीने एका बाळाला जन्म दिला होता.