आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ती उलटे वाचते; टीव्ही, संगणकही उलटे ठेवते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्बियात राहणारी 28 वर्षांची बोजाना डेनिलोविक हिला एक विचित्र आजार आहे. ती कागद उलटा धरून खालून वरपर्यंत वाचते. तिच्या या आजारामुळे डॉक्टर आणि शास्त्रज्ञ दोघांनाही आश्चर्य वाटत आहे. हॉर्वर्ड विद्यापीठ आणि मेसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधील तज्ज्ञांनी तिची तपासणी केली. बोजाना विशिष्ट प्रकारच्या मानसिक अवस्थेत असल्याचे त्यांना आढळून आले आहे. त्याला ‘स्पेटिअल ओरिएंटेशन फिनॉमिनन’ असे म्हणतात.
व्यापक स्वरूपात सांगायचे झाल्यास तिचे डोळे प्रत्येक वस्तू योग्य पद्धतीने पाहतात मात्र काही कारणामुळे मेंदू, डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींची उलट प्रतिमा तयार करतो. या आजाराशी मिळत्या-जुळत्या केसेस यापूर्वीही आढळून आल्या आहेत. पण बोजानाची केस अद्वितीय आहे. बोजानाच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट उलटी आहे. इतकेच काय तर ती उलटीच जन्मली होती. तिचे आई-वडील सांगतात की, जेव्हा बोजाना रांगू लागली त्यावेळीसुद्धा ती पुढे न जाता मागे रांगत जात होती. चालायला लागली तेव्हाही उलट दिशेनेच चालू लागली. तिला सामान्य मुलांप्रमाणे चालणे शिकवण्यासाठी बोजानाच्या आईने नोकरीवरून रजा घेतली. सरळ चालणे शिकवण्यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागली. आता ती सामान्य लोकांप्रमाणे चालायला शिकली आहे. मात्र, लेखन आणि वाचन करतानाही तिला तोच त्रास होऊ लागला. ती कागद वाचताना खालून उजव्या बाजूने वाचायला सुरुवात करते आणि वरची ओळ डाव्या बाजूपर्यंत पूर्ण करते. शिक्षक आणि मित्र-मैत्रिणींनी तिला सरळ वाचायला शिकवायचे खूप प्रयत्न केले. मात्र, परिणाम काही दिसले नाहीत. बोजाना सध्या अर्थशास्त्राची पदवीधर असून तिला तिच्याच शहरातील नगरपालिकेत नोकरी मिळाली आहे. मात्र, जेव्हा तिने मॉनिटर आणि की-बोर्ड उलटे ठेवून काम करायला सुरुवात केली, तेव्हा कर्मचार्‍यांना धक्काच बसला. ती घरीदेखील टीव्ही उलटा ठेवून पाहते.